Who Is Vaishali Darekar : श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची मोठी चाल, मनसेकडून लढलेल्या उमेदवाराला कल्याणमध्ये तिकीट, कोण आहेत वैशाली दरेकर?
Shiv Sena UBT Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून कल्यात मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. वैशाली दरेकर कोण आहेत, हे जाणून घ्या.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीतून श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारी वैशाली दरेकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena UBT) उमेदवारांची दुसरी यादी (Candidates Second List) जाहीर केली आहे. ठाकरे गटाने दुसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha Constituency) वैशाली दरेकर (Vaishali Darekar-Rane) यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देत पक्षाने विश्वास दाखवला आहे. कल्याण लोकसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर लोकसभेच्या रणांगणात उतरणाऱ्या वैशाली दरेकर कोण आहेत, सविस्तर वाचा.
कल्याणमध्ये वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या उमेदवार
शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्यात मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हणाले, मी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना परत शिवसेनेत घेणार नाही. प्रत्येकाने अनुभव घ्यायचा आहे, त्यांचा गुरु अनुभव शिकवेल. त्यांचा राजकीय करिअरबद्दल त्यांनी विचार करावा. त्यांना त्यांचा लख लाभ, आता त्यांनी पुढे काय करायचं ते त्यांनी ठरवावं, असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
कल्याण लोकसभेमधून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना तिकीट जाहीर झालं आहे.
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी
शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
- वैशाली दरेकर : कल्याण
- सत्यजित पाटील : हातकणंगले
- करण पवार : जळगाव
- भारती कामडी : पालघर
कोण आहेत वैशाली दरेकर? (Who Is Vaishali Darekar)
- 2009 साली वैशाली दरेकर या मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभे होत्या, त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती.
- 2010 ला कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसे तर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
- विरोधी पक्षनेते म्हणून कल्याण डोंबिवली मनपा पद भूषवले.
- 2009 च्या अगोदर या शिवसेनेत होत्या.
- पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत गेल्या.
- पक्ष फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेत राहिल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
उद्धव ठाकरेंचे 21 उमेदवार जाहीर, ठाकरेंचे उमेदवार कोणत्या मतदारसंघात कुणाविरुद्ध लढणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
