(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
आम्ही 1500 देतो तेव्हा आम्हाला विचारता बजेटचं काय? यांच्या योजना दीड दोन महिन्यात बंद झाल्या आमच्या योजना सहा महिन्यपासून सुरू असल्याची टीका शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने फसवी पंचसूत्री वचननामा जाहीर केला आहे. महिलांना 3 हजार देणार म्हणतात, आम्ही 1500 देतो तेव्हा आम्हाला विचारता बजेटचं काय? यांच्या योजना दीड दोन महिन्यात बंद झाल्या आमच्या योजना सहा महिन्यपासून सुरू असल्याची टीका शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केली.
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल!
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून केलेल्या टीकेला मनीषा कायंदे खोचक शब्दात टोला लगावला आहे. राज ठाकरे यांच्याबाबत फार बोलायचं नाही, पण त्यांनी केलेलं वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल, असे म्हणत बोचरा बाण सोडला आहे. आम्ही राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता. त्यांनी लेफ्ट टर्न मारला. दरम्यान, अजित पवार हे जरी नवाब मलिक यांच्या प्रचारात सहभागी होत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे आमची भूमिका मलिकांविरोधात स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
गेल्या पाच वर्षात आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
वैद्यकीय विमा 25 लाख या निव्वळ भूलथापा आहेत
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवर मनीषा कायंदे यांनी तोफ डागली. त्या म्हणाल्या की, महिलांना कुठल्या बस प्रवास फ्री देणार, आम्ही महिलांना 50 टक्के एसटीत सवलत दिली आहे. संजय राऊत नवीन कुठली बस सेवा सुरू करणार आहे का? 50 टक्के आरक्षणात वाढ करणार मग मुख्यमंत्री असताना काय केलं? आपण या आरक्षणावर कधी बोललात का? काय प्रयत्न केले आरक्षणासाठी? तुम्हीच एकीकडे संविधान बदलण्याचा आरोप करता मग आता काय करत आहात, अशी विचारणा त्यांनी केली. वैद्यकीय विमा 25 लाख या निव्वळ भूलथापा आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपण वापरला नाहीत. मोफत औषध देणार म्हणताय, मग कोरोनात बाॅडी बॅग फ्री का नाही दिलं, रेमडिसीवीर का नाही दिलं? सरकार तरी येणार आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या