एक्स्प्लोर

Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी

Jammu & Kashmir : सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले.

Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज (7 नोव्हेंबर) आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, 'आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. आणि विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची

भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी हाऊसमधील वेलमध्ये खुर्शीद अहमद शेख यांच्याकडे पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले. 

शेखच्या भावावर दहशतवादी फंडिंगचा आरोप

बॅनर फडकावणारे आमदार खुर्शीद अहमद शेख हे बारामुल्लाचे लोकसभा खासदार इंजिनिअर रशीद यांचे भाऊ आहेत. रशीद यांना 2016 मध्ये UAPA अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. ते 2019 पासून तिहार तुरुंगात बंद आहेत.

कलम 370 पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मंजूर

जम्मू-काश्मीर विधानसभेने बुधवारी राज्याचा विशेष दर्जा (कलम 370) बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपने केला असून कोणतीही विधानसभा कलम 370 आणि 35A परत आणू शकत नाही.

सरकारने जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाबाबत बोलावे

सभागृहाचे कामकाज सुरू होताच, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी विशेष दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मांडला, जो केंद्राने 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द केला होता. त्यात म्हटले आहे की, 'राज्याचा विशेष दर्जा आणि घटनात्मक हमी महत्त्वाच्या आहेत. हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या अस्मिता, संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करते. विधानसभा एकतर्फी काढून टाकल्याबद्दल चिंता व्यक्त करते. राज्याच्या विशेष दर्जाबाबत भारत सरकारने येथील प्रतिनिधींशी चर्चा करावी. त्याच्या घटनात्मक पैलंवूर काम केले पाहिजे. हे पैलू राष्ट्रीय एकात्मता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या इच्छा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन व्हायला हवे यावर विधानसभा भर देते. अपक्ष आमदार शेख खुर्शीद आणि शब्बीर कुल्ले, पीसी प्रमुख सज्जाद लोन आणि पीडीपी आमदारांनी पाठिंबा दिला.

भाजपचा आरोप, सभापतींनीच मसुदा तयार केला

जम्मू विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला विरोध केला. मंगळवारी सभापतींनी मंत्र्यांची बैठक बोलावून स्वत: प्रस्ताव तयार केल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे शर्मा यांनी सांगितले. यावेळी ते स्पीकर हाय-हाय, पाकिस्तानी अजेंडा चालणार नाही अशा घोषणा देत राहिले. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करायची असताना हा प्रस्ताव कसा आणला, असा सवालही शर्मा यांनी केला. हा प्रस्ताव आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याची प्रत फाडून वेलमध्ये फेकली. या गदारोळात विधानसभेचे अध्यक्ष अब्दुर रहीम राथेर यांनी या प्रस्तावावर मतदान केले, त्यानंतर हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. भाजप आमदारांच्या आरोपांबाबत अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर म्हणाले, माझ्यावर विश्वास नसेल तर अविश्वास ठराव आणा.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 
माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 
ठाण्यातील कशेळी खाडीत 53 वर्षीय व्यक्तीने घेतली उडी; पाण्यात उतरून शोधमोहिम सुरू
ठाण्यातील कशेळी खाडीत 53 वर्षीय व्यक्तीने घेतली उडी; पाण्यात उतरून शोधमोहिम सुरू
बुलढाणा हादरलं ! ब्रेकअपनंतर तरुणीचा नवा बॉयफ्रेंड बघून एक्स बॉयफ्रेंड बिथरला, प्रेम प्रकरणाला भयानक वळण
बुलढाणा हादरलं ! ब्रेकअपनंतर तरुणीचा नवा बॉयफ्रेंड बघून एक्स बॉयफ्रेंड बिथरला, प्रेम प्रकरणाला भयानक वळण
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं मिळणार?
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 
माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 
ठाण्यातील कशेळी खाडीत 53 वर्षीय व्यक्तीने घेतली उडी; पाण्यात उतरून शोधमोहिम सुरू
ठाण्यातील कशेळी खाडीत 53 वर्षीय व्यक्तीने घेतली उडी; पाण्यात उतरून शोधमोहिम सुरू
बुलढाणा हादरलं ! ब्रेकअपनंतर तरुणीचा नवा बॉयफ्रेंड बघून एक्स बॉयफ्रेंड बिथरला, प्रेम प्रकरणाला भयानक वळण
बुलढाणा हादरलं ! ब्रेकअपनंतर तरुणीचा नवा बॉयफ्रेंड बघून एक्स बॉयफ्रेंड बिथरला, प्रेम प्रकरणाला भयानक वळण
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं मिळणार?
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं मिळणार?
Oil Imports :  डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफसह दंडाची धमकी वाया, भारताकडून रशियाकडून तेल खरेदी सुरुच राहणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा
ट्रम्प यांची टॅरिफसह दंडाची धमकी वाया, भारताकडून रशियाकडून तेल खरेदी सुरुच राहणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा
देशातील 10 बड्या कंपन्यांना मोठा फटका, TCS चं 47000 कोटींचं नुकसान, तर रिलायन्स आणि HDEC  ला मोठा नफा 
देशातील 10 बड्या कंपन्यांना मोठा फटका, TCS चं 47000 कोटींचं नुकसान, तर रिलायन्स आणि HDEC  ला मोठा नफा 
Delhi Murder Mystery: आशिकच्या प्रेमाखातर नवऱ्याला मारून नाल्यात फेकलं; हत्येसाठी दाजींच्या भावाला गाडी विकून 50 हजाराची सुपारी
आशिकच्या प्रेमाखातर नवऱ्याला मारून नाल्यात फेकलं; हत्येसाठी दाजींच्या भावाला गाडी विकून 50 हजाराची सुपारी
Share Market :  TCS ला पाच दिवसात तब्बल 47000 कोटींचा फटका, रिलायन्स अन्  HDFC ची जोरदार कमाई 
TCS ला पाच दिवसात तब्बल 47000 कोटींचा फटका, रिलायन्स अन्  HDFC ची जोरदार कमाई 
Embed widget