Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : शास्त्रात प्राण्या-पक्ष्यांशी संबंधित अनेक शकुन आणि अपशकुन सांगण्यात आले आहेत. या प्राण्या-पक्ष्यांमध्ये कावळ्याचाही समावेश आहे. कावळा वेळोवेळी शुभ-अशुभ संकेत देत असतो.
Chanakya Niti : हिंदू धर्मात शकुन अपशकून यांना फार महत्त्व आहे. प्रत्येक कार्याच्या आधी घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना भविष्यातील घटनांशी जोडून पाहिलं जातं. शास्त्रात प्राण्या-पक्ष्यांशी संबंधित अनेक शकुन आणि अपशकुन सांगण्यात आले आहेत. या प्राण्यांमध्ये मांजर, गाय, कुत्रा, पक्षी आदींचा समावेश आहे. ज्योतिष्यशास्त्रात कावळ्याशी (Crow Shastra) निगडीत अनेक शकून आणि अपशकून सांगितले गेले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया,
कावळ्याद्वारे दिले जाणारे शुभ संकेत
* प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या समोर कावळा आवाज करून गेला, तर त्या व्यक्तीचे काम यशस्वी होते.
* कावळा पाणी भरलेल्या भांड्यावर बसलेला दिसला, तर धन-धान्यात वृद्धी होते.
* कावळ्याच्या चोचीत अन्नाचा किंवा मांसाचा तुकडा दिसला तर, चांगले फळ प्राप्त होते.
* कावळा गायीच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते.
* कावळा आपल्या चोचेत कोरडं गवत घेऊन जाताना दिसल्यास धनलाभ होतो.
*कावळ्याच्या चोचेत फूल-पानं दिसल्यास माणसाची इच्छा पूर्ण होते.
* कावळा धान्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतो आणि गायीच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते.
* उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते.
* डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती मिळते.
* जर कावळा धुळीत लोळताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते.
कावळ्याद्वारे दिले जाणारे अशुभ संकेत
* जर अनेक कावळे एखाद्या गावात एकत्रितपणे आवाज करीत (ओरडत) असतील, तर त्या गावावर एखादे संकट येणार आहे, असे मानले जाते.
* एखाद्या घरावर कावळ्यांचा समूह येऊन आवाज करत असेल, तर घराच्या मालकावर विविध संकट एकाच वेळी येण्याची शक्यता आहे.
* एखाद्या मनुष्याच्या अंगावर कावळा येऊन बसला, तर त्याच्या पैशाची हानी होते.
* उडणाऱ्या कावळ्याने एखाद्या व्यक्तीला चोच मारली, तर त्या व्यक्तीला आजार होण्याची शक्यता असते.
*कावळा पंख फडफडत कर्कश आवाज करीत गेला, तर तो अशुभ संकेत असतो.
* जर कावळा आकाशाकडे तोंड करून कर्कश आवाज करीत असेल, तर तो मृत्युचा संकेत आहे असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :