Vijay Shivtare : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर चर्चेनंतर शिवतारेंकडून वेळकाढूपणा? उद्या बैठक घेत निर्णय घेणार
Vijay Shivtare on Mahayuti, Pune : अपक्ष लढण्याचा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. पर्वा रात्री जवळ-जवळ अडीच तास चर्चा झाली.
Vijay Shivtare on Mahayuti, Pune : "अपक्ष लढण्याचा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. पर्वा रात्री जवळ-जवळ अडीच तास चर्चा झाली. रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही बारिक-सारिक विषयांवर चर्चा केली. माझं लोकांच्या बाबतीत काय म्हणणे आहे, ते मी मांडलं. मतदारसंघातील लोकांच्या भावना मी त्यांच्यासमोर सांगितल्या. परंतू, लोकांमधून मी निर्णय घेतला होता. तसंच उद्या 11 वाजता पुरंदरेश्वरा सासवड येथील निवासस्थानी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते यांची बैठक होईल. साधारण 11 ते 1.30 वाजेपर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत. सर्वांची मतं मी ऐकून घेणार आहे", त्यानंतर भूमिका जाहीर करणार, असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी स्पष्ट केले. ते पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेवटी आम्ही स्वत:साठी लढत नसतो
विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? हे सर्व कार्यकर्त्यांना सांगणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचे हे तिथे ठरवले जाईल. एक ते दीड दरम्यान उद्या सासवडमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. माघार हा शब्द वेगळा आहे. राजकारणामध्ये विचारपूर्वक सर्व कामे करायची असतात. शेवटी आम्ही स्वत:साठी लढत नसतो. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढतो. त्याबाबत काय चर्चा झाली? ती लोकांना सांगणार आहे. त्यानंतर लोकांचा काय मूड आहे, कार्यकर्त्यांना मूड काय आहे? त्यानंतर निश्चितपणे निर्णय घेईल. निर्णय घेऊनच मी मुंबईला जाणार आहे, असं शिवातारे (Vijay Shivtare) यांनी सांगितलं.
राजकारणात कोणीही कोणाचा कायम स्वरुपी दुष्मन नसतो
पुढे बोलताना विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, राजकारणात कोणीही कोणाचा कायम स्वरुपी दुष्मन नसतो आणि दोस्तही नसतो. मात्र, लोक हित कशामध्ये आहे. त्याचा नीट विचार करुन जे जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं. महायुतीच्या बाबतीतील चर्चा जशीच्या तशी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे. त्यानंतर सर्वांचा कानोसा घेऊन. मग ते पॉझीटीव्ह असेल किंवा नेगेटिव्ह असेल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी गाठ घेणार आहोत. त्यांना वस्तुस्थिती सांगितली जाईल. मी जनतेचा आवाज बघून अजितदादांना विरोध केला होता. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. भोर, इंदापूर, दौंड, बारामती सर्व ठिकाणचे कार्यकर्ते अॅक्टिव्ह होते. ते शक्तिशाली आणि ग्राऊंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते होते. त्या सर्वांना उद्या बोलावण्यात आलं आहे. फक्त पुरंदरच्याच नाही, असंही शिवतारे (Vijay Shivtare) यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या