'पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले', नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
Thackeray Group On Symbol: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळालं असून मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. यावरच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना 'पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले', असं म्हटलं आहे.
Thackeray Group On Symbol: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळालं असून मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. यावरच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना 'पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले', असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत की, पहिल्याच प्रयत्नात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे जिंकले आहेत. याचं कारण म्हणजे आम्हाला जे नाव मिळालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नाव राहिलं. बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव राहिलं. आम्ही तीन जी निशाणी मागितली होती. त्यातली मशाल ही निशाणी आम्हाला मिळाली. त्यामुळे पहिल्या डावात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. म्हणून आम्ही आनंदी आहोत, असं ते म्हणाले आहेत.
उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली : चंद्रकांत खैरे
नवीन नाव आणि चिन्ह याबाबत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, रविवारी शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हेच नाव सुचवलं होत. आम्ही निवडणूक आयोगाला सुचवलेल्या चिन्हात पहिल्या क्रमांकावर त्रिशूळआणि तीन नंबरवर मशाल होती. मात्र आम्हाला त्रिशूळ मिळाली नाही, माशाला हे चिन्ह मिळालं. सुरेश भटांचा एक गाणं आहे, उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली, आता आम्ही मशाल पेटवू, असं ते म्हणाले आहेत.
यावरच आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. खरी लढाई पहिली जिंकली. त्या म्हणाल्या की, उषःकाल होता होता, काळरात्र झाली. शिवसैनिकांनो पेटवा आयुष्याच्या मशाली असं त्या म्हणाल्या आहेत. पेडणेकर म्हणाल्या, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे.
यावरच बोलताना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, ''हे विधी लिखित होत. शिवसेना ही बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंपासून कोणीही वेगळी करू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही समाधानी आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. जी माशाला निशाणी आम्ही मागितली, ती देखील आम्हाला मिळाली आहे.''