बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होतो: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: ज्या छत्रपतींनी आम्हाला अस्मिता दिली, आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, त्या महाराष्ट्रातील जनेतला आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: ज्या छत्रपतींनी आम्हाला अस्मिता दिली, आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, त्या महाराष्ट्रातील जनेतला आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिन फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा दिवस आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर भाजपच्या बुस्टर डोस सभेत बोलत असताना त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत म्हणाले आहेत की, काही लोकांना असं वाटत ते म्हणजेच महाराष्ट्र आहे.
तुम्ही म्हणजे हिंदू नाही..
देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''काही लोकांचा गैर समज आहे की, ते म्हणजेच महाराष्ट्र आहे. त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातीच्या 12 कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे. तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे, हिंदू नाही..पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही.''
बाबरी मशीद पाडली तेव्हा मी तिथेच होतो : देवेंद्र फडणवीस
बाबरी मशिदीवरून फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हणाले आहेत की, ते (उद्धव ठाकरे) काय म्हणाले परवा, म्हणाले बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. कोणीतरी प्रश्न केला, मशिदींवरील भोंगे काढायला यांना जमलं नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी मशिद पाडली. तो बाबरी ढाचा.. मी त्याला मशिद मानत नाही. कोणी हिंदू मशिद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला. माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर, त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिरा करता बदायूच्या तुरुंगात मी 18 दिवस घालवले.''