Shivajirao Naik Joins NCP: माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी; शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश, म्हणाले...
Shivajirao Naik Joins NCP: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी पुन्हा हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे.
Shivajirao Naik Joins NCP: शरद पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी पुन्हा हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवाजीराव नाईक यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचं कौतूक केलं. केवळ शरद पवारचं महाराष्ट्राचं विकास करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
"आजच्या शुभदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होतोय हा शुभचिन्ह आहे.शरद पवार यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्र आहे, आमच्या या भागातील सर्व गावांतील खडा अन् खडा माहीत आहे. या तालुक्यातून जो शरद पवार यांचा विचार जाईल तो संपूर्ण राज्यभर पसरेल. शरद पवार यांचे राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या कामावर बारीक लक्ष असतं. आमच्या भागात नोकऱ्यांचा प्रश्न आहे, चांदोली धरणाचा पर्यटन विभागाकडून विकास झाला तर विकास होईल. चांदोलीला एक सर्प उद्यान काढा, मत्स्यालय उभा करा इथं नोकरीचा प्रश्न सुटेल. राज्याचा विकास केवळ शरद पवार साहेब करू शकतात", अस शिवाजीराव नाईक यांनी म्हटलं आहे.
"शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यानंतर राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "1995 साली शिवाजीराव नाईक विधानसभेत निवडून गेले. अनेक वेळा यश मिळालं काही वेळा अपयश मिळालं पण त्यांनी काम थांबवलं नाही. आम्ही विरोधात असताना देखील आमच्यात कटुता नव्हता. कोणत्याही घरात गेले तरी ते माझ्या घरात यावं लागेल याची खात्री होती. संपूर्ण राज्यभर पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नाईक यांचे स्वागत करत असताना आनंद होतोय. भाजप रोज म्हणत मंत्री फुटणार, आमदार फुटणार आम्ही बोलत नाही काम करतो. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार साहेब विकासाची मोठी शक्ती आहे", असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा-
- Bachhu Kadu : जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार, गुढीपाडव्यानिमित्त मंत्री बच्चू कडू यांचा संकल्प
- Marathi Bhasha Bhavan : मराठी भाषा भवनाचे आज भूमिपूजन; असं असेल हे भव्य भवन, कोट्यवधींचा खर्च
- Ajit Pawar : अजित दादा थेट बोलले, मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून बातम्या येतात!