एक्स्प्लोर

Marathi Bhasha Bhavan : मराठी भाषा भवनाचे आज भूमिपूजन; असं असेल हे भव्य भवन, कोट्यवधींचा खर्च

Marathi Bhasha Bhavan : आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेलं मराठी भाषा भवन कसं असेल...

Marathi Bhasha Bhavan : आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे. मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे.  सुमारे 2100 चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. अंदाजे 126 कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास ॲन्ड  असोसिएट्स यांची वास्तु विशारद म्हणून निवड करण्यात आली आहे.

कसे असेल मराठी भाषा भवन?

मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन चर्नी रोडला समुद्र किनारी उभे राहणार आहे. प्रकल्पाची जागा चर्नी रोड येथील समुद्राभिमुख भूखंडावर असेल.

हे स्थळ मरीन ड्राइव्हच्या समोर आहे आणि पश्चिमेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि पूर्वेला सावित्रीदेवी फुले महिला वसतीगृहाने वेढलेले आहे. जागेची लांबी अंदाजे 54 मीटर आणि रुंदी सरासरी 32 मीटर असेल.

मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल.  त्याची लांबी 39 मीटर आणि रुंदी सुमारे 22 मीटर असेल.  

संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. इथे मरीन ड्राईव्हच्या लोकांना थेट प्रवेश करता येईल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल.

इमारतीचे दुसरे प्रवेशद्वार उत्तरेकडील मोकळ्या जागेतून दिलेले आहे जिथून जिना आणि लिफ्टमध्ये प्रवेश करणे शक्य आहे.

इमारतीमध्ये 200 आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 145 क्षमतेचे अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एक मजला प्रशासकीय आणि कार्यालयीन जागा असेल.

चार मजल्यांच्या प्रदर्शन दर्शिकेला चार विभागांमध्ये वर्गीकृत केले आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा  प्रवास इथे बघता येणार आहे.

या दर्शिकेतील प्रदर्शनात विशेष तयार केलेले चलचित्रपट, त्रिमितीय प्रतिमा (होलोग्राम्स) आणि छायाचित्रांच्या प्रती असतील.

अंदाजे 50 फूट/35 फूट महाराष्ट्राचा नकाशा लक्ष वेधुन घेणारा ठरेल.

हा नकाशा भाषेच्या उत्क्रांतीत योगदान देणाऱ्या सर्व प्रतिष्ठित विजेते आणि व्यक्तिमत्त्वांच्या स्थानांचे चित्रण करेल.

हा नकाशा अभ्यागतांकडून त्यांच्या मूळ स्थानासह प्रत्येक वैयक्तिक संकेतस्थळ आणि व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डिजीटल पद्धतीने वापरता येईल.

दर्शिकेच्या 4 मजल्यापैकी 3 मजले तांब्याच्या धातुपासून तयार केलेल्या जाळीने वेढलेले असणार आहे. यासाठी खास मराठी लिपीच्या अक्षरांच्या रचनेतून ही जाळी तयार करण्यात येणार आहे.

इमारतीमध्ये 200 क्षमतेचे सभागृह आहे आणि ते तळघरात बांधलेल्या भागात असेल.

इमारतीच्या मागील बाजूस बहुमजली वाहनतळ प्रस्तावित आहे.

प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र अंदाजे ६५८३ चौ.मी. (७०,८५८ चौ. फूट) एवढे असेल. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget