Rohit Khadse : अजित पवारांवर लक्ष ठेवायला फडणवीसांनी स्वत:चा खास अधिकारी नेमला, शिंदेंचीही पद्धतशीर कोंडी, सरकार पडण्याची वेळ जवळ आलीय : रोहिणी खडसे
चैत्यभूमीवरील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाषणे वगळण्यात आली. यावरून रोहिणी खडसे यांनी सरकारला डिवचले आहे.

Rohini Khadse : चैत्यभूमीवर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C P Radhakrishnan) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भाषणे झाली. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणे वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आदल्या रात्रीच ही भाषणे वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सरकारला डिवचले आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, दादा डोईजड होताय म्हणून आधी मंत्रालयातील फाईली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत-पालकमंत्री पदात भेदभाव केला, असे त्यांनी म्हटले.
दादा डोईजड होताय म्हणून आधी मंत्रालयातील फाईली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत-पालकमंत्री पदात भेदभाव केला. पुन्हा रायगडावर दादांना डावलून भाईंना… pic.twitter.com/ywKq14ulA4
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 15, 2025
आज नाहीतर उद्या अडखळून पडणार हे निश्चित!
रोहिणी खडसे यांनी पुढे म्हटलंय की, पुन्हा रायगडावर दादांना डावलून भाईंना बोलण्याची संधी दिली. मात्र भाई 2 पाऊल पुढचे निघाले. मोटा भाय मुंबईत आल्यावर एकटेच जाऊन पाऊण तासाची मीटिंग करून आले. मग लक्षात आलं भाई पण जास्तच पुढे पुढे करतायेत. मग दोघांना जागेवर आणण्यासाठी थेट भाई-दादांचे चैत्यभूमीवरील भाषण कापून टाकले. एकंदरीत काय तर सरकार कसं चालू आहे? प्रचंड ओढाताण, प्रचंड रस्सीखेच... एकमेकांच्या पायात... आज नाहीतर उद्या अडखळून पडणार हे निश्चित! असे भाकीत त्यांनी केले आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांनी 14 एप्रिल रोजीच्या राज्यपालांच्या कार्यक्रमाची प्रत शेअर केली आहे. ज्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा स्पष्ट उल्लेख दिसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या

























