Eknath Khadse: तुझे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, गिरीश महाजनांनी हात झटकताच अमित शाहांनी सीडीआर समोर ठेवला: एकनाथ खडसे
Eknath Khadse: गृहमंत्री अमित शाह यांना भेटून यासदंर्भाच विचारणा करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

जळगाव: राज्यातील जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वाद सर्वांनाच परिचित आहे. अशातच 'गगनभेदी'चे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखला देत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर नेते एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संकटमोचक अशी ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संंबध असल्याचा खळबळजनक दावा केला असून त्या महिला अधिकाऱ्याचे नाव देखील माहिती असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना भेटून यासदंर्भाच विचारणा करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर गिरीश महाजन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली त्याची माहिती देखील त्यांनी या त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
एकनाथ खडसे व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाले?
आपल्या व्हिडिओमध्ये एकनाथ खडसेंनी म्हटलंय, "गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या 'रंगल्या रात्री अशा' गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंधत आहेत. त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र, ते नाव सांगणं उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शाहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.अमित शाह यांनी गिरीश महाजन यांना सांगितले की, तुझे एका महिला आयएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत, परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की, नाही माझे कामानिमित्त बरेचसे अधिकाऱ्यांसोबत बोलले सुरू असते. पण, शाहांनी त्यांना सांगितले की, तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर-शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आहे", असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
मी देखील अमित शाहांना भेटणार
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, "मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शाहांना भेटणार आहे आणि अमित शाहा आणि माझी भेट होतच राहते. त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे", असं खडसे म्हणाले आहेत.
खडसेंच्या गौप्यस्फोटावर महाजान काय म्हणाले?
कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचं असेल तर निघणं मुश्किल होईल. त्यांचं सगळं संपलेलं आहे. त्यांचे दुकान बंद झालेलं आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात. महाराष्ट्राला माहित आहे मी काय आहे. ते नेहमी म्हणतात पुरावे आहेत सीडी आहेत. मी वारंवार त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा. त्यांचे जावई तीन वर्ष जेलमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या पत्नीला मात्र महिला आहे म्हणून आम्ही जाऊ दिले नाही. त्यांच्याबद्दल लवचिकता घेतली. विनाकारण कमरेखालची भाषा करायची घाणेरडे बोलायचं. स्वतः नंबर एकच महाचोर आहेत. सगळे धंदे त्यांचे लोकांना माहित आहेत. मी जर त्यांच्याबद्दल एका गोष्टीची वाचता केली तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील.
ते ज्येष्ठ आहेत वयाने मोठे आहेत बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावं, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात माझ्याकडे हे आहे ते आहे मात्र कशासाठी ते असे. लोकांची दिशाभूल करतात. म्हणून काय असेल ते सांगावं मात्र मी जर काही सांगितलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील. मी त्यांच्या प्रमाणे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरेखालची भाषा शोभत नाही. मी सात वेळा आमदार आहे मंत्री आहे त्यामुळे हे बघून त्यांची जळफळाट होत आहे. त्यांचे खूप वाईट दिवस आले आहेत. सर्व बघून त्यांची जळफळाट होत आहे. त्यामुळे ते वाटेल ते बेभान स्टेटमेंट करत आहेत. मला वाटतं त्यांच्याकडे एक जरी पुरावा असेल तर त्यांनी द्यावा बडबड नाही करायची. गेल्या अनेक वर्षापासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चरित्र हरण करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता लोकांना दाखवा. यांना दिले त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते डिलीट झाले मोबाईल हरवला हे हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का. माझं आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका.मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही मला बोलायला लावू नका.






















