एक्स्प्लोर
Raj Thackeray: पुरोहितांचे आशीर्वाद घेउन राज ठाकरे रवाना, अमित ठाकरेंकडून देवीचं दर्शन ABP Majha
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे उद्या होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झालेत. उद्याची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते.. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. यानंतर राज ठाकरे पुण्याहून रवाना झालेत. थोड्याच वेळात राज वढू इथं संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने निघालेत..
आणखी पाहा























