एक्स्प्लोर

Israel Iran Conflict : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद ठार? पश्चिम आशियात तणाव शिगेला

Israel Iran War : महमूद अहमदीनेजाद हे 2005 ते 2013 या कालावधीत इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या पाश्चिमात्य देश आणि इस्त्रायलच्या विरोधातील वक्तव्यांमुळे ते चर्चेत असायचे. 

Israel Iran Conflict : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा दावा माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यात ते ठार झाल्याचे वृत्त समोर आले असून या घटनेमुळे पश्चिम आशियातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणी लेबर न्यूज एजन्सीने रविवारी (1 मार्च 2026) दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल-अमेरिका एअर स्ट्राईकमध्ये अहमदीनेजाद यांच्या तेहरानमधील निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्यासह अनेक अंगरक्षकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा दावा (Mahmoud Ahmadinejad Death Claim)

महमूद अहमदीनेजाद हे 2005 ते 2013 या कालावधीत इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी अर्दबिल प्रांताचे राज्यपाल तसेच तेहरानचे महापौर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चिमविरोधी भूमिकेमुळे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिले. इस्रायलच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणि कठोर वक्तव्यं करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.

माध्यमांतील दाव्यानुसार, तेहरानच्या नरमक भागातील त्यांच्या निवासस्थानावर हवाई हल्ला करण्यात आला. मात्र या वृत्ताला अधिकृत पातळीवर अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर तणाव (Khamenei Death Impact)

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर इराणमध्ये नव्या नेतृत्व परिषदेने कार्यभार स्वीकारल्याचे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. खामेनी यांनी तब्बल 36 वर्षे इराणवर प्रभावी नियंत्रण ठेवले होते. त्यांची तुलना अनेकदा अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्याशी केली जात असे, ज्यांनी 1979 मध्ये इस्लामी प्रजासत्ताक इराणची स्थापना केली होती.

इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. पश्चिम आशियातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे.

भारतात शिया समाजाचे आंदोलन (Shia Protests in India)

खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर भारतातील विविध भागांत शिया समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत, तसेच नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि तेलंगणा येथे निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईविरोधात घोषणाबाजी केली.

पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक (West Asia War Update)

पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होत असून अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील तणाव जागतिक पातळीवर परिणाम घडवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Accident News : पुणे बेंगलोर हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे बेंगलोर हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Embed widget