Prithviraj Chavan on Ram Mandir : तुम्ही मुद्यावर निवडणूक लढा, दगडातच देव असतो का? राम मंदिरावरुन पृथ्वीराज चव्हाणांचे पीएम मोदींना सवाल
Prithviraj Chavan on Ram Mandir : ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं तीच लोक आज नाचत आहेत. मुळे राम मंदीराचा फार काही परिणाम वाटत नाही. गावात खासगी मंदिर बांधलं आणि राम मंदिर बांधल यात काय फरक आहे?
Prithviraj Chavan on Ram Mandir : ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं तीच लोक नाचत आहेत. मुळे राम मंदीराचा फार काही परिणाम वाटत नाही. गावात खासगी मंदिर बांधलं आणि राम मंदिर बांधल यात काय फरक आहे? मोदींना राम मंदिराचा राजकीय भाग घ्यायचा होता. अयोध्येच्या बाहेर त्याचा प्रभाव नाही. इमोशनल ब्लॅकमेल करता का तुम्ही? दगडातच देव असतो का? मला वाटल तर मी कराडच्या मंदिरात जाईल. तुम्ही मुद्यावर निवडणूक लढा, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
जागांची आदला बदल होऊ शकते
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, नरेंद्र मोदींचे सरकारला घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. बंडखोरी होत असेल तर कार्यकत्यांना शांत केले पाहिजे. फोनवरून सर्व सुरु आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायची यावर चर्चा झाली. त्यानंतर आमच्या दिल्लीतील नेत्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ही आकडेवारी बाहेर आली. जागांवरुन आकडेवारी बदलेल त्यामुळे जागांची आदला बदल होऊ शकते. आदला बदल करायला काहीही हरकत नाही. जागा वाटपाचा आदलाबदल होऊ शकते मात्र मी कोणाचही नाव घेणार नाही. दोन पक्षांच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो, असंही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.
उमेदवारांची जात, त्याचा जन्म ठिकाण, पैसा या सर्वांचा प्रश्न असतोच
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, जर कोणाकडे सक्षम पर्याय असेल तर विचार होऊ शकेल. मतदार संघाची वाटणी, इतिहास, स्थानिक पातळीवरील संघटना या संदर्भात मांडणी झाली नाही. उशीर झाला हे मान्य करतो. पहिल्यांदा तीन तीन पक्षाची आघाडी होत आहे. उमेदवारांची जात, त्याचा जन्म ठिकाण, पैसा या सर्वांचा प्रश्न असतोच. अशोक चव्हाण यांना उपमुख्यमंत्री आणि चांगल खात घ्यायचं होत. मात्र त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढलं, असंही चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी स्पष्ट केलं.
कोल्हापुरात शाहू महाराज यांच्यासाठी सर्वांचा आग्रह होता
राष्ट्रीय पक्षांना निर्णय घेण्यास थोडा वेळ लागतो. मुंबईत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. दक्षिण मध्य मुंबई आणि पुनम महाजन यांची जागा मागीतली होती. यावर अजून ही चर्चा करुन निर्णय होऊ शकतो. कोल्हापूर शाहू महाराज यांच्यासाठी सर्वांचा आग्रह होता. त्यामुळे सांगलीच्या जागेवर राग काढून ती आम्हालाच द्या,अस योग्य नाही. सांगली काँग्रेसच्या विचारांचा मतदार आहे,त्यामुळे परस्पर यांच्या मान्यतेने निर्णय होऊ शकतो, असंही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या