एक्स्प्लोर

Prakash Mahajan : धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री असल्यानेच सुरेश धसांची माघार; प्रकाश महाजनांचा जोरदार प्रहार

Prakash Mahajan on Suresh Dhas : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्यानंतर प्रकाश महाजन यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Prakash Mahajan on Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लक्ष्य केले होते. मात्र, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली. यानंतर विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. आता मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

प्रकाश महाजन म्हणाले की, सुरेश धस विषयी बीड जिल्ह्यात साधारण समज आहे की, असा कोणताही राजकीय नेता नाही, ज्याला धस यांनी राजकीय दृष्ट्या फसवलं नाही. बीड जिल्ह्यात दोन गट होतात की काय? अशा टोकावर परिस्थिती पोहोचली होती. सुरेश धस यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या धनंजय आणि पंकजा यांच्यावर बरंच तोंडसुख घेतलं. विधानसभा निवडणुकीतील भ्रष्टाचाराविषयी त्यांनी बोलून जनमत आपल्या बाजूने घेतलं. आता असं काय झालं होतं की त्यांना धनंजय मुंडेंची भेट घ्यावी लागली, त्यांची छोटी शस्त्रक्रिया झाली होती. अनेकांचा विश्वासघात सुरेश धस यांनी केला आहे. पंकजा असं म्हणाल्या होत्या की,  आष्टीकडे लक्ष द्यावे लागेल, या भीतीपोटीच तर त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली नाही ना? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

धनंजयचे रक्षक मुख्यमंत्री असल्यानेच सुरेश धसांची माघार

बीडच्या जनतेचा विश्वासघात धस यांनी केला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडे कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी धस यांना तंबी दिली असावी. त्यामुळे धस यांनी आपले तांदूळ चार तास बावनकुळे यांच्याकडे बसून धुतले असावे. धस काही धुतल्या तांदळाचे नाहीत, असा हल्लाबोल देखील प्रकाश महाजन यांनी केलाय. तर धनंजय मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनवणे या बीडमधील गँगला एकमेकांच्या गोष्टी माहिती आहेत. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कोर कमिटीत घेतलं. त्यामुळे आता धनंजय मुंडेंचे काही होणार नाही, सुरेश धस यांनी म्हणून माघार घेतली. धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री असल्याने सुरेश धसांनी माघार घेतली असावी, असे देखील प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...

... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget