PM Modi Leaves For Japan: क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जपानला रवाना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही घेणार भेट
PM Narendra Modi Leaves For Japan: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी जपानला दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे.

PM Narendra Modi Leaves For Japan: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी जपानला दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौऱ्यात ते प्रभावशाली गटातील सदस्य देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित क्वाड लीडर्स समिट (क्वॉड समिट 2022) मध्ये भाग घेतील.
या शिखर परिषदेमुळे चार सदस्य देशांच्या नेत्यांना क्वाड उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल, असे मोदींनी एका निवेदनात म्हटले आहे. 24 मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या शिखर परिषदेत मोदींशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेसे सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हा दौऱ्याशी संबंधित परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट केले की, “ विश्व कल्याणाची शक्ती पुढे नेण्याचा प्रवास. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोला रवाना. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानेसे, जपानचे पंतप्रधान किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्याशी होणार चर्चा.
शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी, बायडन, किशिदा आणि अल्बानेसे यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय बैठक ही घेणार आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, "जपानमध्ये मी क्वाड नेत्यांच्या दुसर्या वन-ऑन-वन शिखर परिषदेत सहभागी होणार आहे, ज्यामुळे चार क्वाड देशांच्या नेत्यांना क्वाड उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल. आम्ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडी आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवरही ते विचार विनिमय करतील."
24 मे रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मे रोजी टोकियो येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. यादरम्यान दोन्ही नेते युक्रेन संकटावरही चर्चा करतील. दरम्यान, युक्रेनवरील रशियन हल्ल्याला ज्या दिवशी 4 महिने पूर्ण होत आहेत, त्याच दिवशी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना हवे असल्यास ते सरकारही बदलू शकतात, पंजाबमध्ये केसीआर यांचा हल्लाबोल
Coronavirus : भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरियंट सापडला, INSACOG ची पुष्टी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
