एक्स्प्लोर

खदखद फेम कराळे मास्तरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सोशल मीडिया स्टारला उमेदवारी मिळणार का?

Nitesh Karale : सोशल मीडियातून स्टार बनलेले मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Nitesh Karale Joins Sharad Pawar's NCP : सोशल मीडियातून स्टार बनलेले मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी (दि.30) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असतानाच कराळे मास्तरांनी आज (दि.29) पक्षप्रवेश केला. त्यामुळे त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

प्रवेशानंतर काय म्हणाले नितेश कराळे ?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नितेश कराळे म्हणाले," मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा   शरद पवार साहेब व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्वर ओक येथे प्रवेश घेतला. लवकरच मी माझी भूमिका आणि फेसबुक,इंस्टाग्राम, youtube, ट्विटर व प्रसार माध्यमाढून वरून जाहीर करील. 

मोदी सरकार पाडण्यासाठी लढले पाहिजे 

पुढे बोलताना नितेश कराळे म्हणाले, पवार साहेब व जयंत पाटील साहेब यांच्या प्रचंड आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील वाटचालीची सविस्तर चर्चा करून हा प्रवेश घेण्यात आला आहे. केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार  पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे.  या भूमिकेतून हा निर्णय मी घेतला आहे. सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो आतापर्यंत विश्वास दाखवला आहे.तो विश्वास यानंतरही मी कायम ठेवेल आणि यानंतरही मी माझी कणखर भूमिका युट्युब, फेसबुक, आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून मांडत राहील.हे मा.पवार साहेबांशी बोलूनच मी माझा प्रवेश पक्षात घेतला.

माजी आमदार अमर काळे यांचाही शरद पवार गटात प्रवेश 

'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व  प्रदेशाध्यक्ष  आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस किशोर माथणकर, राजाभाऊ ताकसांडे, आफताब खान, कराळे गुरुजी, सुधीर कोठारी हे उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Eknath Shinde : गेले शिंदे कुणीकडे? मुख्यमंत्री पाच तासांपासून गायब, कुणाचाही संपर्क नाही; दादा भुसे- सामंत-गोडसे वैतागून निघून गेले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 11 November 2024PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभाAjit Pawar Baramati : साहेब नसतील तर तालुका कोण बघणार?अजितदादांचा बारामतीकरांना सवालVidhan Sabha News : राहुल गांधींचा दौरा ते खोतकर-दानवे भेट; राजकीय घडामोडींचा आढावा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Embed widget