एक्स्प्लोर

निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात एका राजकीय पक्षाने आयोजित केलेली पार्टी कार्यकर्त्याच्या जीवावर बेतली, या पार्टीसाठी आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला

चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून गावागावात कार्यकर्ते एकत्र येत आहेत. वार्ड आणि प्रभागतही नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. गेल्या 8 दिवसांपासून प्रचारसभांनी जोर धरला असून दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, गावात किंवा कार्यकर्त्यांच्या शेतात बैठकांचे व पार्ट्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांना एकत्र जमविण्यासाठी जेवणावळी बसल्या जात आहेत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात अशीच एका राजकीय कार्यकर्त्यांची मेजवाणी ठरली असता, दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत गावातील माजी उपसरपंचांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात एका राजकीय पक्षाने आयोजित केलेली पार्टी कार्यकर्त्याच्या जीवावर बेतली, या पार्टीसाठी आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रविवारी रात्री पार्टी आयोजित केली होती. यात जवळच्या पांझुर्णी गावातील माजी उपसरपंच गजानन काळे हे देखील सहभागी झाले होते. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. काहीतरी पडल्याचा आवाज येताच सगळे त्यांच्या दिशेने धावले. पडलेल्यांपैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. मात्र, गजानन काळे यांचा बुडून मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज सकाळी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मात्र, या प्रकरणी गुन्हा अद्याप दखल करण्यात आलेला नाही. विहिरीत पडलेल्या व्यक्ती नशेत होत्या का, त्यांना कुणी धक्का दिला का, हा अपघात आहे की घातपात, अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीचा माहोल असताना एका राजकीय पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले असून घटनेच्या चौकशीची मागणी केली जात आहे. 

हेही वाचा

मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget