'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना बटेंगे तो कटेंगाचा नारा दिला होता.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रचारफेऱ्या आणि प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दिल्लीतील दिग्गज नेतेही महाराष्ट्रात येऊन प्रचारसभा घेत आहेत, या सभांमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. त्यातच, भाजपकडून बटेंगे तो कटेंग आणि एक है तो सेफ है... असा नारा देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात या घोषणांची चांगलीच चर्चा आहे. अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य करुन हे नारे देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर, महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या अजित पवारांनीही या घोषणेवरुन महायुतीच्या काही नेत्यांना फटकारले होते. आता, महायुतीत नसले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचा एका शब्दात समाचार घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना बटेंगे तो कटेंगाचा नारा दिला होता. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है, असा नारा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात धार्मिक वितु्ष्ट तर आणलं जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच, अनुषंगाने राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांनी भूमिका मांडताना भाजपला लक्ष्य केलं. दोन वेगवेगवळ्या गोष्टी आहेत, कटेंगे तो बटेंगे हे जे वक्तव्य आहे ते वाहियात (फालतू) आहे, यातून कुठलाही फायदा होणार नाही. यासारख्या राजकारणामुळेच उत्तर प्रदेशात मोठं नुकसान झालं. मी तुम्हाला सांगतो, धार्मिक उन्माद झाल्यानंर बाबरी मस्जिद पाडली, देशभरात दंगली झाल्या, उत्तर प्रदेशही दंगलीत अडकला होता. कल्याणसिंग यांचं सरकार बरखास्त करण्यात आलं. मात्र, 4 महिन्यांतच निवडणूक झालं आणि भाजपचा दारुण पराभव झाला. कोर्टाच्या आदेशानंतर देशात राम मंदिर बांधण्यात आलं, तरीही उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा पराभव झाला. धर्मावर आधारित राजकारण जास्त दिवस चालत नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, रोटी, कपडा आणि मकान या तत्त्वावर राजकारण व्हायला हवं.
एक है तो सेफ है यांसारखे जे वक्तव्य आहे, त्यानुसार भाजपची भूमिका बदलत आहे का. हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई सर्वजण एक आहेत. प्रांत व भाषा रचनात्मक असूनही देशवासीय सर्वजण एक आहेत ही जर भाजपची भूमिका असेल तर चांगली बाब असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
#WATCH | #MaharashtraAssemblyElections NCP leader and candidate from Mankhurd Shivaji Nagar, Nawab Malik, says "Statements like 'batenge toh katenge' are disgusting. There can be no benefit from this. This kind of politics has caused a lot of damage in Uttar Pradesh...Even after… pic.twitter.com/HBWgNmfO0M
— ANI (@ANI) November 11, 2024
बटेंगे तो कटेंगेबाबत काय म्हणाले अजित पवार
बटेंगे तो कटेंगे याबाबत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एक्स पोस्ट वरती बोलताना अजित पवार म्हणाले, मी महायुतीमध्ये एक घटक पक्ष आहे, आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वरती एकत्र आलेलो आहोत. विचारधारा भिन्न आहेत. पाठीमागच्या काळामध्ये अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत सरकारमध्ये घालवले. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि आमची विचारधारा वेगळी होती. परंतु त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती आम्ही एकत्रित आलेलो होतो. आता देशाचा विकास व्हावा राज्याचा विकास व्हावा या मुद्द्यावर आम्ही या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो आहे, मी आजही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी माझं मत निगडित आहे. आत्ताही आहे आणि पुढेही राहणार आहे. ही माझी भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवार म्हणालेत.
हेही वाचा
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज