एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली

Madha Assembly Constituency : माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील, अपक्ष म्हणून रणजीत बबनदादा शिंदे आणि महायुतीकडून अजित पवार गटाच्या मीनल साठे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून गेल्या काही दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात (Madha Assembly Constituency) शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील (Abhijeet Patil), अपक्ष म्हणून आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) यांचे पुत्र रणजीत शिंदे (Ranjit Shinde) आणि महायुतीकडून अजित पवार गटाच्या मीनल साठे (Minal Sathe) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता अभिजीत पाटील यांनी बबन दादा शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे. 

माढा विधानसभेची निवडणूक अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीनंतर दिवसेंदिवस चुरशीची बनत चालली असून बबनदादा शिंदे यांचे निकटवर्तीय भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. यासोबत आमदार शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असणारे संजय कोकाटे यांनीही अभिजीत पाटील यांच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. 

अभिजीत पाटलांची ताकद वाढली 

अभिजीत पाटील यांच्या काल रात्री तुळशी येथे झालेल्या सभेला विराट गर्दी झाल्याने शिंदे गट हादरून गेला आहे. एका बाजूला आमदार शिंदे गटाने शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, ओबीसी नेते शिवाजीराजे कांबळे यांना आपल्या गोटात घेतल्याने अभिजीत पाटील थोडे बॅक फुटला गेले असे वाटत होते. मात्र अभिजीत पाटील यांनी थेट बबनदादा शिंदे यांचे निकटवर्तीय भारत शिंदे आणि कट्टर विरोधक संजय कोकाटे यांना एकाच दिवशी प्रचारात उतरवल्याने पुन्हा एकदा माढ्यात तुतारीची हवा सुरू झाली आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचाराची कमान ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील सांभाळत असून महत्त्वाच्या सभांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थिती लावत आहेत. काल रात्री तुळशी येथे झालेली सभा ही या निवडणुकीतील सर्वात मोठी सभा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता अभिजीत पाटील वाढल्याचे दिसून येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Polls IANS- MATRIZE Survey: मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला किती जागा मिळणार?, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget