एक्स्प्लोर

मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?

वाढपी घरचा असल्यावर जास्त वाढणार ना? चार जण जेवायला बसलो तर आई  लाडक्या लेकाला वाढते ना? नळी, नळ्या वाढते ना.. असे अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात एका भाषणातून राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. बारामती मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना आता खासदारकीचे दीड वर्षे उरले आहेत, पुढे पुन्हा सभागृहात जायचं की नाही ते ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या भाषणाचा संदर्भ देत आता अजित पवारांनीही (Ajit pawar) राजकीय निवृत्तीबाबत वक्तव्य केलंय. बारामतीत 1967 पासून जेवढा निधी आणला नव्हता, तेव्हढा मी मागच्या पाच वर्षात आणला आहे. नदीला पाणी कुणी सोडलं ते डोक्यात आणा, कॅनॉल सोडला नसता तर काय अवस्था झाली असती. एकदा त्या पदावर गेल्यावर धमक असली पाहिजे. अधिकाऱ्याला फोन गेल्यावर तो अधिकार खुर्चीवरून उठला पाहिजे. सर.. सर.. केलं पाहिजे. पुढची लोक म्हणत आहेत अजित पवार निवडून आणले तर तो लायनिंग करेल. तुमचं पाणी जाईल.. मी काय येडा आहे का? मला कळत नाही का?, असे म्हणत अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन बारामतीकरांना (Baramati) केलं आहे. बारामतीत सुरक्षितता आहे, बारामतीत दहशत नाही असेही अजित पवार यांनी म्हटले. विशेष म्हणजे शरद पवारांनंतर आता अजित पवारांनीही राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 

वाढपी घरचा असल्यावर जास्त वाढणार ना? चार जण जेवायला बसलो तर आई  लाडक्या लेकाला वाढते ना? नळी, नळ्या वाढते ना.. असे अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. साहेब म्हणाले की, दीड वर्षानंतर मी थांबणार आहे. साहेबांना मी थांबा म्हटलं नाही.. नाहीतर माझ्या नावावर पावत्या फाडतील. जर साहेब नसतील तर कोण बघणार आहे तालुका?. एक कार्यकर्ता दोन वेळा अजितदादा मोठ्याने म्हणाला. त्यावर अजित पवार म्हणाले शहाण्या, अकरा वाजता चंद्रावरती गेलाय. दिवस तरी मावळू देत, असा मिश्कील टोला लगावला. साहेब कधी थांबले?, मी साहेबांचे एकायचे ठरवलं आहे. साहेब 85 ला थांबतील. तेव्हा मी थांबेल, अजून 20 वर्ष आहेत.. जोपर्यंत मी चांगला आहे तोपर्यंत मी काम करीत राहील.. जेव्हा होत नाही त्यावेळी बसून ठरवू, कुणाच्या हातात द्यायचं ते, असे म्हणत अजित पवारांनीही राजकीय निवृत्तीबाबत वक्तव्य केले. 

कालव्याच्या पाण्याबाबत

निरा उजवा आणि नीरा डावा कालव्याचे पाणीवाटप कसं झालं असं सांगा म्हटल्यावर, अजित पवार म्हणाले मी आता सांगत बसत नाही. मला दोन्ही कडची मते पाहिजेत, पण योग्य झालं असेल एवढंच सांगतो. कॅनॉलवर सायपन चालतात ती कुणामुळे चालतात. अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो जरा दुर्लक्ष करा, असे म्हणत कॅनॉलवरील पाण्याबाबत अजित पवारांनी अंदर की बात सांगितली. 

लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला खुश करा.

दरम्यान, आपल्या भाषणात अजित पवारांनी आर.आर. पाटील यांची आठवणही काढली. मी आर. आर. पाटील यांना झापले होते, तंबाखू सोड म्हणून.. त्याला कॅन्सर झाला. जाताना म्हणला दादा ऐकले असत तर बरं झालं असते, अशी भावनिक आठवण त्यांनी सांगितली. 

हेही वाचा

भाजपच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
Raju Shetti : ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha News : राहुल गांधींचा दौरा ते खोतकर-दानवे भेट; राजकीय घडामोडींचा आढावा #abpमाझाABP Majha  Headlines : 1 PM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 NOV 2024Ajit Pawar on Mahayuti : महायुतीला विधानसभेत किती जागा मिळणार? अजित दादा म्हणतात..Amit Thackeray vs Mahesh Sawant :बालीश बोलणाऱ्या महेश सावंतांना अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर,म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
Raju Shetti : ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
IANS- MATRIZE Survey: तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
Uttar Pradesh : जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना पाठलाग करून घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना पाठलाग करून घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
Embed widget