Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Uddhav Thackeray : माझी बॅग चेक करायला हरकत नाही. मात्र, त्या दाढीवाल्या मिंद्याची, मोदी, अमित शाह, गुलाबी जॅकेट आणि टरबूजची बॅग चेक केली का? अशी टीका ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वणीमध्ये संजय देरकर यांच्या प्रचारासाठी पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये उतरताच बॅगेची तपासणी करण्यात आली. बॅगची तपासणी करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणातून घणाघाती हल्ला चढवला. माझी बॅग चेक करायला हरकत नाही. मात्र, त्या दाढीवाल्या मिंद्याची, मोदी, अमित शाह, गुलाबी जॅकेट आणि टरबूजची बॅग चेक केली का? अशी टीका ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी प्रचाराला आल्यानंतर सात ते आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाकानाक्यावर अडवतील तिथे-तिथे तपास अधिकाऱ्यांचे खिसे तपासा. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी-शाहांची बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटसह टरबुजाचीही (फडणवीस) बॅग तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक #निवडणूक - २०२४ | महाविकास आघाडीचे #वणी विधानसभेचे अधिकृत उमेदवार #संजय देरकर ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर #सभा | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | वणी - #LIVE https://t.co/3ismiBTwiD
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2024
उद्धव ठाकरे यांनी वणीमधील सभेमधून बोलताना पीएम मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले की स्वतः मोदी यांना बाळासाहेब यांचे नाव घेऊन मते मागावी लागत आहेत. त्यामुळे मोदी गॅरेंटी चालत नाही हे आता कळालं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपण तीन हजार रुपये देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगित. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करून पेटवून दिलं जात आहे. महिला सुरक्षेबद्दल काही बोललं जात नाही. ठाकरे म्हणाले की, हा वाघांचा परिसर आहे. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी महिलेबद्दल काय बोलले? असे चालतात तुम्हाला अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही सोयाबीन भाव दिला की नाही? कापसाला भाव दिला की नाही? पीक विमा दिला. त्यांनी 370 कलम काढले, काय फायदा झाला? बाळासाहेब भाजपला कमलाबाई असे म्हटले होते. काँग्रेससोबत राहिलो तर शिवसेनेची काँग्रेस होईल का? असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या