एक्स्प्लोर

राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी असलेल्या रोहित पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची नागपूर येथे भेट घेतली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. कारण, गेल्या काही दिवसांतील गाठीभेटी अन् वाढत चाललेली जवळीक सध्या लक्षवेधी ठरत आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे आणि रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या (Ajit pawar) घेतलेल्या भेटी चर्चेत आहेत. तर, आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलंय. विशेष म्हणजे या भेटीदरम्याच्या फोटोमधील काका-पुतण्याची देहबोली आणि चेहऱ्यावरील हास्य देखील सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येतील का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ही केवळ सदिच्छा व वाढदिवस निमित्ताने असलेली भेट होती, असे सांगण्यात आले. पण, त्यानंतरही आमदारांच्या भेटींचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी असलेल्या रोहित पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षातील खासदारांच्या पार पडलेल्या बैठकीनंतरही अशी चर्चा सुरू झाल्याचे समजते. कारण, या बैठकीत खासदारांच्या मागे आगामी काळात तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच, पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका या मुद्द्यांवर चर्चा पार पडली. त्यामध्ये अजित पवारांसोबत जाण्याबाबत काहीजणांनी इच्छा व्यक्त केली, तर काहींनी महायुतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे.  

खासदारांचा बैठकीनंतर पराभूत आणि विजयी आमदारांच्या बैठकीत देखील राष्ट्रवादी एकत्रित होण्याबाबत चर्चा पार पडली आणि याठिकाणी देखील 2 गट पाहायला मिळाले. मात्र, शरद पवारांनी या बैठका झाल्यानंतर कुठलीच प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसून आले. पक्षातील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची आणि शरद पवार यांची भेट झाल्याची बाब समोर आली. त्यातच, शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादी होणार अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.  

अदानींच्या निवासस्थानी भेट

एकीकडे अजित पवार शरद पवार यांची भेट होतं असताना त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट झाल्याचे समोर आले. त्यामुळे, शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत जाण्याऐवजी भाजपसोबत जाण्याचा मार्ग निवडतील का, अशी देखील चर्चा सुरू झाली. कारण केंद्रात एनडीए सरकार मजबूत करायचं असेल तर मोदींना आणखी खासदारांची गरज लागणार आहे, आणि सध्या शरद पवारांकडे 8 खासदार आहेत.  

मुख्य प्रतोदांनी घेतली अजित पवारांची भेट

शरद पवारांची अमित शाह यांच्यासोबतची भेट आणि त्यानंतर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांची वाढलेली जवळीकता पाहता अखंड राष्ट्रवादीची चर्चा जोर धरू लागली. दरम्यान, शरद पवारांच्या दोन्ही मुख्य प्रतोद यांनी विविध कारणास्तव अजित पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. सध्या जरी रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि सलील देशमुख यांनी मतदारसंघातील अडचणीबाबत अजित पवारांसोबत भेटीगाठी होतं असल्याचं म्हंटलं असलं तरी आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्रित येत असल्याचं पाहायला मिळाल्यास त्याची पायाभरणी ही विधानपरिषद, विधानसभा प्रतोद यांच्या होत असलेल्या भेटीगाठीत असेल यात शंका नाही. 

हेही वाचा

जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget