(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : मी राजगादीला मानतो हे उदयराजेंना माहितीये, बार्शी मराठ्यांचं घर घोंगडी बैठक होणार, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा तो सोपल बरा : मनोज जरांगे
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Manoj Jarange Patil, जालना : आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केलेल्या आरोपांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे प्रत्युत्तर दिलं आहे. मी फुकलो तरी उदयराजे भोसले लोकसभा निवडणुकीत पडले असते, असं जरांगे म्हणाले होते, असा दावा राऊत यांनी केला होता. राजेंद्र राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत. बार्शीतील राजेंद्र राऊतांचे विरोधक माजी आमदार दिलीप सोपल बरे आहेत. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत.
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राऊत कशाचाही शपथ घेतो, माझ्याजवळच त्यांनी पाच-पन्नास शपथ घेतल्या असतील. तुला देवेंद्र फडणवीसाचं सरकार निवडून यावं असं वाटतं तर आरक्षण का देत नाही? आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? तुला वेळ आल्यावर कळेल देवेंद्र फडणवीसांचे ऐकून तू किती चिखलात फसला. बार्शी मराठ्यांचं घर तिथं घोंगडी बैठक होणार आहे. राजेंद्र राऊत आपला असून त्याच्यामध्ये फितुरीचे संस्कार आहेत. त्याच्यापेक्षा सोपल बरा म्हणावं लागेल. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत, ते चांगले आहेत. राजेंद्र राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघालाय, असं जरांगे म्हणाले आहेत.
जा मी लय बघितले लुंगे सुंगे, तू (राजेंद्र राऊत) कशाला मराठे कापायची सुपारी येतो?
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, जा मी लय बघितले लुंगे सुंगे, तू (राजेंद्र राऊत) कशाला मराठे कापायची सुपारी येतो? मी काय आहे हे राजेंद्र राऊत दादाला माहितच नाही मी काय चीज आहे. त्यांनी आता फितुरीचे संस्कार दाखवले. पृथ्वीवरचे कुणीतरी क्षत्रिय संपवले होते. तो वारसा यांना देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. जाणव घातले ते मराठे संपवणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नाव खराब करत आहेत. त्याचे उत्तर शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी दिलेच पाहिजे. राऊत मध्यस्थी करत होता पण आपला असून फितुरीचे संस्कार त्याच्यामध्ये आहेत. देवेंद्र फडणीस यांनी काही दिलं असेल .
मी परिणामाची चिंता करत नाही. श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही, त्यांना मराठ्यांची गरज नाही. त्यांना फक्त राजकारणासाठी मराठा पाहिजेत. त्याला दोष देऊन उपयोग नाही, ही सगळी भाषा देवेंद्र फडणवीस यांची आहे. बघुयात ते म्हणत आहेत ना तुकडे तुकडे काय आहे ते बघायचंच आहे. बार्शी मराठ्यांचे घर आहे तिथे घोंगडी बैठक होणार. मी राजगाद्यांना किती माननारा तर हे सगळ्यांना माहिती, उदयनराजे कल्पना राजे ,संभाजी राजे , शाहू राजे महाराजांना ही माहिती आहे .
आता मराठा -मराठ्यांमध्ये दंगली घडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांचं आहे. महाविकास आघाडीतून लिहून घ्या ओबीसी आरक्षण देणार आहेत का सर त्यांचे म्हणणं आहे लिहून घ्यायचे. ठीक आहे तुम्ही म्हणत आहेत तर मी तुमचं चॅलेंज स्वीकारलं. तुमचा मालक तुमचा देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्याकडून तुम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे लिहून द्या. बाकी यांनी नाही लिहून दिल्यावर यांना कसं आडवं तिडव मराठे करतील ते बघू, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Rajendra Raut : मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले होते; आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा