एक्स्प्लोर

अमित ठाकरेंमागे 'महाशक्ती'? माहीम मतदारसंघाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सदा सरवणकरांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर

Mahim Vidhan Sabha: माहीममध्ये अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024: आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Nivadnuk 2024) पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील (Mumbai) माहीम विधानसभेत (Mahim Vidhan Sabha) तिहेरी लढत होणार असल्याचं समोर आलं होतं. माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, शिवसेनेकडून (Shiv Sena) विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना तिकीट देण्यात आलं आहे. तसेच, पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उमेदवार देणार नाहीत, अशा चर्चा होत्या. मात्र, उद्धव ठाकरेंनी महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण, आता माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. माहीममध्ये अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. तसेच, अमित ठाकरेंचा रस्ता सोपा होण्यासाठी विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

सदा सरवणकर लढणार की, हटणार?

माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. पण, असं झाल्यास खरा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातलं आव्हान कमी करण्यासाठी महायुती आणि मनसेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरू असल्याचं दिसत आहे.दोन दिवसांपूर्वी शिंदेचं निकटवर्तीय समजले जाणारे, मंत्री दीपक केसरकर एक खास निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आली. तर, दुसरीकडे आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिलं पाहिजे, असं वक्तव्य करत सस्पेन्स आणखी वाढवला. सदा सरवणकरांना विरोध नाही पण महायुती म्हणून आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू,असं आशिष शेलार म्हणाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोलताना शिंदेंचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी देखील अमित ठाकरेंच्या बाजूनं वक्तव्य केलं. त्यामुळे आता सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

माघार घेण्यास सदा सरवणकर तयार? 

माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकरांना यंदाही शिंदेंकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सध्या त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माहीमधून सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी माघार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं बोललं जात आहे. अशातच माहीम विधानसभेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं सांगितलं जात आहे. अशातच, महत्त्वाची बाब म्हणजे, सदा सरवणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आज 28 ऑक्टोबर रोजी माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकर उमेदावरी अर्ज दाखल करणार होते. मात्र, आता त्यांची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. 

मध्यरात्री सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. माहीम मतदारसंघातून मनसे उमेदवार अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा दिला आहे. मात्र, सदा सरवणकर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर आता माहीममधून तीन टर्म आमदार असलेले सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Kolhapur Uttar Vidhan Sabha :माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati Exclusive : कार्यकर्त्यांचा उत्साह आहे; हीच आमच्या विजयाची नांदी आहेABP Majha Headlines : 3 PM TOP Headlines 28 October 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNarayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वासHasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार
Kolhapur Uttar Vidhan Sabha :माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?
Vasant Deshmukh : मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
मोठी बातमी : जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका
Vishal Patil : 'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
'मी पतंगराव कदमांना खूप त्रास दिला, पण विश्वजित यांच्याकडे उडी मारल्यानंतर..' विशाल पाटील जाहीर कबूली देत काय म्हणाले?
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी
Baramati Vidhan Sabha: बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार: सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
कांदेंविरोधात अपक्ष शड्डू ठोकलेल्या समीर भुजबळांना महायुतीचा पाठींबा? छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Embed widget