Maharashtra Live Updates: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज अमरावतीतून नागपुरात दाखल होणार
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज अमरावतीतून नागपुरात दाखल होणार आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतलीये. आज सकाळी 10.30 वाजता सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू उपस्थित राहणार नाहीत. सरकारने याआधीही बैठका घेतल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलीये..
अमेरिकेच्या लोकांना गंडा घालण्यासाठी रात्रीतून कॉलसेंटर चालवायचे, कर्मचाऱ्यांना 25 हजार पगार, छत्रपती संभाजीनगरमधून 116 जण ताब्यात
छत्रपती संभाजीनगर शहरात बसून अमेरिकन लोकांना फसवणारे कॉल सेंटर संभाजीनगर पोलिसांनी उध्वस्त केलेय. छत्रपती संभाजी नगर शहरातील चिखलठाणा एमआयडीसी मध्ये असलेल्या आयटी पार्क मध्ये हा धंदा सुरू होता. सायंकाळी सहा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे कॉल सेंटर चालवलं जायचं.अमेझॉन चे गिफ्ट व्हाउचर लागल्याचे आमिष दाखवून, टॅक्स न भरल्याची दिशाभूल करत गंडा घातला जायचा . पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून या कॉल सेंटर मधील मेघालय, नागालँड, सिक्कीम येथील मूळ रहिवाशी असलेल्या 116 जणांना ताब्यात घेतलं आहे यामध्ये तरुण मुला-मुलींचा समावेश आहे..
बाईट प्रशांत स्वामी डीसीपी झोन 2
कसे चालत असे कॉल सेंटर
- मेघालय येथील 100 तरुण - तरुणी
- कॉल सेंटर चालवायचे
- एक वर्षापासून सुरू आहे सेंटर
- जिथे हे कॉल सेंटर चालत होते तिथे आतमध्ये पडदे लावलेले होते.
- मध्यरात्री हाय प्रोफाइल गाड्या यायच्या..
- त्यातून कामगार यायचे
- सर्वसामान्य नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक
- मुळे ना व्यक्तीची इमारत आहे त्यांनी ही भाड्याने दिली होती
- त्यांनी मुलांना कंपनी सुरू करण्यासाठी ही जागा घेतली होती, ते एमआयडीसी मध्ये मोठ्या पदावर नोकरीला होते, मात्र त्यांची दोन्ही मुले परदेशात गेले त्यामुळे इमारत भाड्याने दिली आहे...
- एकूण 116 आरोपी
- अमेरिका देशातील लोकांना गंडा
- रात्री पाळीचे काम, सायंकाळी 6 वाजता सुरू करायचे काम,
-
- तरुण तरुणींना २५ हजारांपर्यंत पगार...
- मेघालय, नागालँड, सिक्कीम भागातील जास्त आरोपी आहे
नांदेडनंतर परभणीतही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडली
नांदेड नंतर परभणीत ही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडली
परभणीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची गाडी फोडली
काल नांदेड येथील तहसीलदारांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आज परभणीतही जिल्हाधिकारी यांची गाडी फोडण्यात आली आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेली जिल्हाधिकारी यांची गाडी एका शेतकऱ्याने दगड टाकून फोडली आहे हा शेतकरी नेमका कोण आहे हे अद्याप समजले नसले तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वातावरण मात्र तणावाचे निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची माहिती घेतल्यास काम चालू आहे
























