एक्स्प्लोर

माढ्यात पवारांना काटशह देण्यासाठी भाजपची नवी खेळी, मोहिते पाटलांच्या विरोधकाला गळाला लावणार?

Ram Satpute on Uttam Jankar, Madha Loksbha : माढा लोकसभेत विजय मिळवणे, 2019 च्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला कठिण झालं आहे.

Ram Satpute on Uttam Jankar, Madha Loksbha : माढा लोकसभेत विजय मिळवणे, 2019 च्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला कठिण झाल आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीलाही विरोध केला आहे. शिवाय, सर्वांत महत्वाची बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याने भाजपची साथ सोडत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चारीबाजूंनी भाजपची कोंडी झालीये. मात्र, आता भाजपने डॅमेज कंट्रोलसाठी पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. भाजपने माळशिरसमध्ये उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याची माहिती भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी दिली आहे. 

उत्तम जानकर मोहिते पाटलांचे विरोधक 

धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करीत असताना माढा लोकसभा टिकवण्यासाठी भाजपासाठी उत्तम जानकर यांचे महत्व वाढले आहे. उत्तम जानकर आजवर मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. मात्र, आता उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांसोबत जाण्याचे संकेत एबीपी माझाशी बोलताना दिले आहेत. मात्र, आता भाजपनेही त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे उत्तम जानकर कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशातच राम सातपुते यांनी  जानकर यांच्याशी चर्चा सुरु असून लवकरच गोड बातमी येईल,असा दावा केला आहे . 

उत्तम जानकरांनी राम सातपुतेंविरोधात लढली होती निवडणूक 

उत्तम जानकर यांनी 2019 ची माळशिरस विधानसभा राम सातपुतेंच्या विरोधात लढवली होती. मात्र, या निवडणुकीत मोहिते पाटील राम सातपुते यांच्या पाठिशी उभे राहिले होते. तरिही राम सातपुतेंचा केवळ 2200 मतांनी विजय झाला होता. यावरुन उत्तम जानकर यांची ताकद समजून येते. त्यातच  मोहिते पाटील पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत परत जात असताना उत्तम जानकर यांचे राजकीय महत्व खूप वाढले आहे. 

जनता भाजपच्या मागे आलेली आहे : राम सातपुते 

माळशिरस वगळता इतर पाच मतदारसंघात भाजपासाठी चांगले वातावरण असले तरी माळशिरसचे लीड हीच भाजपाची डोकेदुखी ठरणार आहे. यात मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यास 1 लाख 35  हजाराचे लीड मोहिते पाटील याना मिळेल, असा दावा जयसिंह मोहिते पाटील यांनी केला होता. आता उत्तम जानकर यांच्या संधान बांधण्यासाठी भाजप वरिष्ठांच्या बैठक सुरु असून लवकरच गोड बातमी मिळेल असा दावा राम सातपुते यांनी केला आहे. मी पाच वर्षे माळशिरस तालुक्यातील जनतेचा मुलगा , भाऊ अशा पद्धतीने खूप काम केले असल्याने जनता भाजपच्या मागे आलेली आहे. यातच उत्तम जानकर यांची साथ मिळाल्यास माळशिरस मधूनही भाजप चांगली मते घेईल, असा दावा राम सातपुते यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Omraje nimbalkar on Malhar Patil : रक्तात राष्ट्रवादी, ह्रदयात भाजप आहे, आता किडनीत शिंदे गट टाक, ओमराजेंचा मल्हार पाटलांवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget