Raj Thackeray On Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकरणाची सखोल चौकशी करा, राज ठाकरे यांची मागणी
Raj Thackeray On Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे.
Raj Thackeray On Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''फॉक्सकॉन प्रकरणाची सखोल चौकशी करा'', अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राज यांनी ट्वीट करून ही मागणी केली आहे. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवालही त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले आहेत की, ''फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, ''हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं, हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवं.''
तत्पूर्वी आज आदित्य ठाकरे यांनी या विषयी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, ''वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.'' ते पुढे म्हणाले की, 95 टक्के सर्व व्यवस्थित पार पडले होते. 100 टक्के सायनिंगनंतर ठरणार होतं. सर्व ठरल्यानंतर ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर का गेली. हा एक महत्वाचा प्रश्न आहे.
संबंधित बातमी:
Vedanta Foxconn Semiconductor Project: स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका