Shiv Sena: गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा; बंडखोर आमदार संतोष बांगर यांची चिथावणी
Hingoli: हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Hingoli: हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर बांगर यांनी आज हिंगोलीत शिवसेनिकांशी सवांद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.''
शिवसेनिकांशी सवांद साधत आमदार संतोष बांगर म्हणजे आहेत की, ''मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले, ''आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.''
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती. यावर आपली प्रतिक्रिया देताना बांगर म्हणाले होते की, मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरून हटवू शकत नाही. यानंतर त्यांनी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री ग्सेट हाऊस बाहेर शक्तीप्रदर्शन केले. बांगर यांचे समर्थक जवळपास 20 ते 25 बसमध्ये आले होते. यावेळी बांगर यांच्यासह समर्थकांनी हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो, अशी घोषणाबाजी केली. यावेळी बोसलाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे शक्ती प्रदर्शन नाही, हे प्रेमाचं दर्शन आहे, असं म्हणाले होते.
बांगर यांना मिळणार मंत्रिपद?
येत्या 20 जुलै रोजी शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. अशातच माध्यमांशी बोलताना बांगर यांनी मला मंत्रिपद मिळावं अशी अनेक कार्यर्त्यांच्या भावना आहे, असं म्हटलं होत. तसेच मला मंत्रिपद देत असतील तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसैनिक वाढवल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले होते. अशातच त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार का, हे पाहावं लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ
पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
Rajesh Kshirsagar : कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप