अमावस्येमुळे धैर्यशील मोहिते पाटलांचं पाऊल अडलं, गुढीपाडव्याला शरद पवार गटात प्रवेश, 15 तारखेला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार?
Dhairyashil Mohite Patil will Joins NCP Sharadchandra Pawar : धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.
![अमावस्येमुळे धैर्यशील मोहिते पाटलांचं पाऊल अडलं, गुढीपाडव्याला शरद पवार गटात प्रवेश, 15 तारखेला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार? Dhairyashil Mohite Patil will join Sharad Pawar's NCP on 9th and will file his nomination form from Madha on 15th Maharashtra Politics Sharad Pawar Marathi News अमावस्येमुळे धैर्यशील मोहिते पाटलांचं पाऊल अडलं, गुढीपाडव्याला शरद पवार गटात प्रवेश, 15 तारखेला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/b3f7224cf9d8e7f34cab9eb3f5ca80fb1712330071044924_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhairyashil Mohite Patil will Joins NCP Sharadchandra Pawar : धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील 9 तारखेला प्रवेश करुन 15 तारखेला प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. अमावस्याच्यापूर्वी निर्णय नको म्हणून गुढी पाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील माढातून लढणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर धैर्यशील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येऊ लागली होती.
शरद पवारांनी आतापर्यंत 7 उमेदवार जाहीर केलेत
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे तर शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये अजित पवार गटातून नुकतेच घरवापसी केलेल्या निलेश लंकेंना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे.
माढा लोकसभेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडही इच्छुक
माढा लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाडही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत कधी प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी
भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मात्र, 2019 निवडून आल्यानंतर संपर्क ठेवला नसल्याने निंबाळकरांवर माढातील मोठा वर्ग नाराज आहे. दरम्यान अशातच मोहिते पाटील यांच्या घरातील उमेदवार दिल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)