![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Devendra Fadnavis : निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये सामील होईल, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis, Jalna : पवार साहेब हे दृष्टे आहेत, त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतोय. या निवडणुकीनंतर त्यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट हे चालवणं कठीण जाईल.
![Devendra Fadnavis : निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये सामील होईल, देवेंद्र फडणवीसांचा दावा Devendra Fadnavis Sharad Pawar's group and Thackeray group will join Congress after elections, claims Devendra Fadnavis Maharashtra Politics Marathi News Devendra Fadnavis : निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये सामील होईल, देवेंद्र फडणवीसांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/e1df4789d0b4ff5e8e3f42e71b04e2261715191306870924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis, Jalna : "पवार साहेब हे दृष्टे आहेत, त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतोय. या निवडणुकीनंतर त्यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी प्रादेशिक पक्षांबाबतच्या विलनीकरणाचे स्टेटमेंट दिले. मला निश्चित खात्री पडतीये की निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट काँग्रेसमध्ये सामील होईल", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. फडणवीस यांनी जालना (Jalna) येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी महाराजांच्या अनुयायांचा विजय झाला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुती सरकारने शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला, त्याला न्यायालयाने देखील आक्षेप घेतला नाही. तर कोणी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत असेल तर तो न्यायालयाचा अवमान असेल. बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी महाराजांच्या अनुयायांचा विजय झाला, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
ऊन खूप असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू आहे
मतदान कमी झाले असं बोलत आहेत. मात्र ऊन खूप असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू आहे. नियमानुसार रात्री सात वाजता मतदान टक्केवारी जाहीर करावी लागते. त्यामुळे अंदाजे आकडेवारी दिली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकूण आकडेवारी जाहीर केली जाते. आता पराभव झाल्यावर काहीतरी कारण लागेल म्हणून आतापासून ओरड सुरू केल्याची टीका फडणवीस यांनी केली.
ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी
शरद पवार यांच्या विरोधात आमची निवडणूक नाही, मुळात ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. कारण सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या राहुल गांधी यांच्या बाजूला बसणार आहेत, तर सुनेत्रा ताई निवडून आल्या तर त्या मोदीजींसोबत असणार आहेत. त्यामुळे त्यात शरद पवार यांचा संबंध नाही, असं देखील फडणवीस यांनी सांगितलं.
शरद पवार काय म्हणाले होते?
येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. आगामी काळात छोटे छोटे पक्ष आमच्यासोबत येतील. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. काँग्रेस आणि आम्ही दोघंही नेहरू-गांधी विचारसरणीने चालणारे आहोत, असंही शरद पवार म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
घाबरले का? अदाणी, अंबानी टेम्पोने पैसे देतात यांचा वैयक्तिक अनुभव, राहुल गांधींचे पीएम मोदींना जोरदार प्रत्युत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)