क्लासमधलं किरकोळ भांडण पालकांनीच नेलं विकोपाला, दुसऱ्या मुलीच्या घरात घुसून काळं निळं होईपर्यंत बेदम मारहाण, महिलेसोबत घाणेरडं वर्तन
घटनेच्या दिवशी पोलिसांसमोरच मारहाण करणारा कुटुंब पोलिसांना सांगत होतं, होय आम्ही मारहाण केली आहे, काय करायचे ते करा.. त्यावेळी पोलिसांच्या समोरून मारहाणकर्ते प्रसार झाले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये दोन विद्यार्थीनींमध्ये झालेल्या भांडणावरून एका विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी काही लोकांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या आई वडिलांना घरात घुसून अमानुषपणे बेदम मारहाण केली .तसेच विद्यार्थिनीच्या आई सोबत घाणेरडवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .मारहाण करणाऱ्या आरोपी आई-वडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावला आहे . आरोपी संदीप लंके, त्याची पत्नी आणि अज्ञात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . मारहाण झालेल्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय .
नेमकं घडलं काय ?
छत्रपती संभाजीनगर शहराच्या सातारा परिसरातून धक्कादायक घटना समोर आलीय. दोन मैत्रिणींचा शिकवणीमध्ये वाद झाला एका मैत्रिणींनी आपापल्या घरी सांगितला. तिच्या पालकांनी आणि अन्य दोन लोकांनी दुसऱ्या मैत्रिणीचं घर गाठलं आणि घरात कोंडून तिच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी होती की सदरील महिलेचे अंग काळं निळं पडलंय आणि घटनेच्या चौथ्या दिवशीही कुटुंब घाबरलेलं आहे.. घटनेच्या दिवशी पोलिसांसमोरच मारहाण करणारा कुटुंब पोलिसांना सांगत होतं, होय आम्ही मारहाण केली आहे, काय करायचे ते करा.. त्यावेळी पोलिसांच्या समोरून मारहाणकर्ते प्रसार झाले. आज पोलिसांचे दोन पथक याच आरोपींचा शोध घेत आहे. मारहाणीचे हे फोटो पाहिल्यानंतर कोणाचीही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.. ही मारहाण पेशानं शिक्षिका असलेल्या एका महिलेला आणि तिच्या पतीला झालीये.
घरात कोंडून मारहाण, संपूर्ण कुटुंब दहशतीत
छत्रपती संभाजीनगरच्या एका क्लासेस मध्ये दोन मैत्रिणीत वाद झाला क्लासेस चालकांनी दोघींना बोलावून समोरासमोर एकमेकींना माफी मागायला लावली. खरं तर प्रश्न इथे संपला होता. पण माफी मागितल्या घटनेच्या नंतर चौथ्या दिवशी सदरील मुलीचे पालक दुसऱ्या मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांना कोंडून मारहाण केली..
आज पेशाने शिक्षिका असलेली महिला डोळ्यात पाणी आणि माझ्या कुटुंबियाला वाचवा अशी आर्जव करणारी ही ही महिला पुरती हादरून गेली आहे, या महिलेच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा किती बेदम मारहाण केली हे सांगण्यास पुरेशा आहेत .हे संपूर्ण कुटुंब आता दहशतीत आहे . आम्हाला न्याय द्या अशी मागणी हे कुटुंबीय करतायत.
पोलिसांसमोर आरोपींची मग्रुरी
धक्कादायक म्हणजे मारहाण झाल्यानंतर शिंदे दाम्पत्यांनी पोलिसांना फोन केला, तिथे पोलीसही आले आणि पोलिसांसमोर आरोपी निघून गेले असा आरोप शिंदे कुटुंबीयांनी केला आहे पोलिसांना मग फोन करून उपयोग काय असा त्यांचा सवाल आहे...याबाबत पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे आरोपींच्या शोधासाठी दोन पथक तयार केली आहे आणि लवकरच आरोपींना जेरबंद करू असा आश्वासन पोलिसांनी दिला आहे
योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी
एवढ्या जबर मारहाण करण्याच्या घटनेमध्ये पोलिसांसमोरून प्रसार झालेले आरोपी चार दिवसानंतर ही पोलिसांना मिळत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होतो आहे.मुलांच्या वादात ना अशा पद्धतीने पालकांनी जाऊन मारहाण करणे निश्चितच योग्य नाही मुलांचे वाद होत असतात पालकांनी ते समजून घेणे गरजेचे होत . त्याऐवजी घरात घुसून मारहाण करणाऱ्यांना योग्य ते शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या अंबादास दानवेंनीही केलीय.

























