एक्स्प्लोर
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार; सोबतीला शरद पवारांचे आमदार, पाहा फोटो
ज्या घरात संत नामदेव महाराज यांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Eknath Shinde award namdeo maharaj
1/8

ज्या घरात संत नामदेव महाराज यांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2/8

नामदेव महाराजांचे 16 वे, 17 वे आणि 18 व्या वंशजांकडून हा घरगुती पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून संत नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी आणि वारकरी या सोहळ्यासाठी जमले होते.
3/8

भक्तशिरोमणी श्री संत नामदेवांचे सोळावे वंशज केशव महाराज, माधव महाराज, कृष्णदास महाराज, मुकुंद महाराज हे असून निवृत्ती महाराज, हरी महाराज, एकनाथ महाराज, विठ्ठल महाराज आणि हरी महाराज हे सतरावे वंशज या सोहळ्यात सहभागी होते. विशेष म्हणजे संत नामदेवरायांचे अठरावे वंशज वैष्णव महाराज हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
4/8

संत नामदेव महाराज यांच्या तीन पिढ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांचा हा सन्मान करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण नामदेवांचा वाडा फुलांनी सजविण्यात आला आहे. ज्या विठ्ठल मूर्तीला संत नामदेव रोज जेवण दिल्याशिवाय स्वतः भोजन करत नव्हते त्याच केशवराज मूर्ती समोर हा सत्कार सोहळा होणार आहे.
5/8

संत नामदेव महाराज यांची पगडी, सन्मानपत्र, वीणा, सन्मानचिन्ह, तुळशीहार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करतेवेळी एकनाथ शिंदे यांच्यावर वारकऱ्याकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
6/8

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यासाठी सर्वच संताचे वंशज आणि वारकरी संप्रदायातील बडे महाराज मंडळी उपस्थित, आध्यात्मिक सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान झाला.
7/8

विशेष म्हणजे पंढरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील हजेरी लावली होती.
8/8

शिवसेना नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमवेत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आणि भाजपचे आमदार समाधान अवताडेही हेही सोबतीला होता.
Published at : 24 Jul 2025 05:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















