शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता विलिनीकरणाची भाषा बोलू लागलेत: देवेंद्र फडणवीस
शरद पवारांनी संकेत दिले कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे : प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं फडणवीस म्हणाले. धुळ्यातील शिरपूर (Dhule Shirpur) येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांना असं म्हणायचं असेल त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे त्यांच्या डोक्यात असेल. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील.
शरद पवारांच्या मुलीकडे बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी राजकीय कौशल्य अपुरे : संजय निरुपम
काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेले मजी खासदार यांनी देखील शरद पवारांच्या भाकितानंतर मोठा दावा केला आहे. संजय निरुपम म्हणाले, बारामती हातून निसटून जाण्याची भीती शरद पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी विलिनीकरणाचं सूतोवाच केलंय, तसंच काँग्रेसनेही यापूर्वी अनेकदा हा प्रस्ताव दिलाय. मात्र यात तिढा होता तो म्हणजे सुप्रिया सुळेंचा ..प्रदेश काँग्रेसची धुरा ही सुप्रिया सुळेंकडे द्यावी. पण काँग्रेसने हा प्रस्ताव झिडकारुन लावला. काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पवारांकडे पर्याय नाही. कारण त्यांच्या मुलीकडे असलेले राजकीय कौशल्य बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी अपुरे आहे.
माननीय शरद पवार जी एक अर्से से अपनी पार्टी कॉंग्रेस में विलीन करने की सोच रहे हैं।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 8, 2024
कॉंग्रेस ने भी कई बार उन्हें यह प्रस्ताव दिया था।
पेंच फँसा था बेटी को लेकर।
उन्होंने बेटी को महाराष्ट्र में कॉंग्रेस का नेतृत्व सौंपने का आग्रह किया था,जिसे कॉंग्रेस ने ठुकरा दिया था।
अब हालात बदल…
काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील असं भाकित वर्तवलंय. पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आलंय. दरम्यान आगामी काळात छोटे छोटे पक्ष आमच्यासोबत येतील असं शरद पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. काँग्रेस आणि आम्ही दोघंही नेहरू-गांधी विचारसरणीने चालणारे आहोत.