आईनेच केला चिमुकल्याचा सौदा? धाराशिवमध्ये दत्तकाच्या नावाखाली मुलाच्या विक्रीचा आरोप, नेमकं घडलं काय?
सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलाला शोधून काढत त्याला बालकल्याण समितीसमोर हजर केलं. तेव्हा मुलगा अतिशय कमजोर अवस्थेत सापडला

Dharashiv crime: धाराशिव जिल्ह्यातील मुरूम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शंभर रुपयांच्या दत्तक करारावर 10 हजार रुपये घेऊन एका चिमुकल्या मुलाची विक्री केल्याचा प्रकार घडला असून सोलापुरातील एका दाम्पत्यावर मुलाची विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. हे संपूर्ण प्रकाराबाबत मुलाची आजी हीच फिर्यादी आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिची सून आणि सुनेच्या मामीने मिळून चाळीसगावमधील एका व्यक्तीला तिच्या नातवाला विकलं. असा आरोप करण्यात आलाय. (Crime News) सामाजिक कार्यकर्त्यांनी हे दत्तक नसून सरळसरळ मुल विकल्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय.
नातवाला विकलं, आजीची फिर्याद
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंभर रुपयांच्या दत्तक करारावर 10,000 रुपये घेऊन एका चिमुकल्या मुलाची विक्री झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, मुलाची विक्री केल्याचा आरोप सोलापूरातील एका दांपत्यावर करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत मुलाची आजी ही मुळातील फिर्यादी आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या सुन आणि सुनाच्या मामीने मिळून चाळीसगावमधील एका व्यक्तीला तिच्या नातवाची विक्री केली आहे. मुलाच्या आईने दुसरं लग्न केलं असून, पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर नव्या पतीच्या सांगण्यावरून मुलाला दत्तक देण्यात आल्याचा उल्लेख संबंधित दत्तक करारामध्ये करण्यात आला आहे.
सोलापुरातील दाम्पत्यावर आरोप
मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी याला "दत्तक" नसून सरळ सरळ मुलाची विक्री असल्याचा आरोप केला आहे. या व्यवहारात केवळ १० हजार रुपये देऊन मुलाची जबाबदारी सोलापूरमधील कुटुंबाकडे हस्तांतरित करण्यात आली. विशेष म्हणजे या साऱ्या प्रकरणाची सुरुवात मुलाच्या आजीने मुरूम पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मिसिंग तक्रारीतून झाली. तिने सून आणि नातू बेपत्ता असल्याची माहिती दिली होती.यानंतर तपास करत असताना मुलाच्या आईने दुसरं लग्न केल्याचं आणि त्यानंतर नातवाला दत्तक दिल्याचं समोर आलं. मुलाच्या वडिलांनीही नातवाला न दिल्याने आत्महत्या केल्याचा आरोप आजीने केला आहे.
मुलगा कमजोर अवस्थेत सापडला
सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलाला शोधून काढत त्याला बालकल्याण समितीसमोर हजर केलं. तेव्हा मुलगा अतिशय कमजोर अवस्थेत सापडला. त्याला ताप, गालफुगी आणि जुलाब होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे तातडीने त्याला धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, धाराशिवच्या सरकारी रुग्णालयाबाहेर मुलाला दत्तक घेणाऱ्या महिले आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा























