आरबीआयने लहान शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी एक नवीन नियम लागू केलाय.. या नियमामुळे आता लहान शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेणे सोपे होणार आहे. नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना किती कर्ज मिळणार? याची माहिती आपण जाणून घेऊयात...देशातील अनेक शेतकऱ्यांना शेती करताना भांडवलीसाठी पैसा हवा आहे. त्यासाठी शेतकरी कृषी कर्ज काढतो. त्यामुळे आरबीआयने लहान शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केलीय.आरबीआयच्या नवीन नियमानुसार, आता शेतकरी त्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून शेती कर्ज घेऊ शकतात. पूर्वी काहीही गहाण न ठेवता कर्ज घेण्याची मर्यादा होती, परंतू, आता नवीन नियमानुसार, शेतकरी आता स्वतःच्या इच्छेनुसार त्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतात. आरबीआयच्या या नवीन नियमामुळे लहान शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होईल. 11 जुलैपासून लागू झालेल्या या नियमानुसार, बँका आता शेतकऱ्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात. यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण संमती आवश्यक आहे. या नवीन नियमाचा फायदा असा होईल की जर एखाद्या शेतकऱ्याने त्याचे सोने-चांदी गहाण ठेवले तर त्याला काहीही गहाण न ठेवता कर्ज घेण्याच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाणार नाही.दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या खर्चामुळं शेती परवडेना असं झाल्याचं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. अशातच आता आरबीआय ने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपये पर्यंत कर्जाची नवीन योजना सुरू केली.