एक्स्प्लोर

Deepak Kesarkar: मंत्री अन् माजी मंत्र्यांमध्ये जुंपली; दीपक केसरकर म्हणाले, उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की...

Deepak Kesarkar On Uday Samant Nanar Refinery: महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येत आहे. 

Deepak Kesarkar On Uday Samant Nanar Refinery सिंधुदुर्ग: कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प (Nanar Refinery) होणार अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणे यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. शिवाय नारायण राणे यांनी बारसु रिफायनरी ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येत आहे. 

नाणार ग्रीन रिफायनरी वरून कोकणातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसून आले. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार असं एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरी कडे माजीमंत्री आणि आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही रिफायनरी 'ग्रीन रिफायनरी' आहे का? हे तपासून पाहाव लागेल अस वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील मतभिन्नता समोर आली आहे. तर रिफायनरीच्या मुद्यावरून दिपक केसरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला आहे. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत, की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पुर्ण जगभराची माहीती आहे, असा टोला दिपक केसरकर यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

मला पद द्यायला साईबाबा समर्थ- दीपक केसरकर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहीले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले असल्याचे सांगत शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील नीलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मी यापेक्षाही मोठ्या पदावर जाईन असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत . त्यामुळे जी मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे, असं मत दीपक केसरकरांनी व्यक्त केलं आहे. 

उदय सामंत नाणार रिफायनहीबाबत काय म्हणाले होते?

कंपनी यायला जर तायार असेल तर प्रयत्न करणार, असं नारायण राणे म्हणाले. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. चर्चा करून मार्ग सोडवू... नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा. 2019 च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही, असं सांगितलं होत. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र त्यांनी केंद्राला लिहिलं होत. पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार, असं उदय सामंत म्हणाले. 

दीपक केसरकर काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार; नारायण राणेंच्या विधानाने चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 25 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 25 December 2024  एबीपी माझा  Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
Embed widget