एक्स्प्लोर

मोदींच्या मंत्रिमंडळात 7 खासदारांवाल्या शिंदेंपेक्षा 5 वाले चिराग पासवान अन् 2 वाले कुमारस्वामी 'वजनदार'

एनडीए आघाडीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज पंतप्रधानांसह केंद्रीयमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

मुंबई : मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाचा आज 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) एनडीएमधील विविध पक्षांच्या या 72 खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, भाजपच्या सर्वाधिक मंत्र्यांनी शपथ घेतली असून घटक पक्षाच्या खासदारांना केवळ एक-एक मंत्रिपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तेलुगू देसम पक्षाच्या चंद्राबाबू नायडू यांना 2 आणि नितीश कुमार यांच्या जनात दल युनायटेड यांच्याही दोनच खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदी सरकार 3.0 मध्ये शपथ घेतलेल्यांमध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांना संधी मिळाली आहे.  मात्र, 7 खासदार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला केवळ 1 मंत्रीपद तेही राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) देण्यात आलं आहे. 

एनडीए आघाडीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज पंतप्रधानांसह केंद्रीयमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला मालदीव, मॉरिशस,श्रीलंका, बांग्लादेश, भूतान या देशांतील प्रमुखांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रीक केली असून मोदींसह नितीन गडकरी, रामदास आठवले या दोन्ही नेत्यांनीही मंत्रिपदाची हॅटट्रीक केली आहे. महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली असून भाजपच्या 2 नेत्यांना कॅबिनेटमंत्री, शिंदेंच्या 1 खासदाराला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि रिपाइंच्या रामदास आठवलेंसह उर्वरीत भाजपच्या 2 खासदारांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 4, शिंदेंचे 1 आणि रिपाइंचे 1 असे एकूण 6 मंत्री असणार आहेत. 

मोदी सरकार 3.0 च्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या पक्षांमध्ये मुत्सदेगिरी (बार्गेनिंग पॉवर) करण्यात कर्नाटकचे एच.डी.कुमारस्वामी, लोजपाचे चिराग पासवान आणि रिपाइंचे रामदास आठवले महाराष्ट्रातील शिंदेंपेक्षा भारी ठरले आहेत. कारण, 7 खासदार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 1 मंत्रिपद देण्यात आलं असून तेही केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हे देण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांच्याकडे 5 खासदार असून त्यांना कॅबिनेटमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर, रिपाइंच्या रामदास आठवले यांच्याकडे लोकसभेतून निवडून आलेला एकही खासदार नसताना त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे, या राजकीय मुत्सदेगिरीत शिंदेंपेक्षा लोजपा आणि कर्नाटकमधील जेडीएस वजनदार ठरल्याचं दिसून येत आहे. 

एच.डी. कुमारस्वामींना कॅबिनेट

कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनात दल सेक्युलर पक्षाला 2 खासदार असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले, तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदी शपथ देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील ह्या 6 मंत्र्यांनी घेतली शपथ

नितीन गडकरी - कॅबिनेट
पियुष गोयल - कॅबिनेट
प्रतापराव जाधव - राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
रामदास आठवले - राज्यमंत्री
रक्षा खडसे - राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ - राज्यमंत्री

हेही वाचा

Modi Cabinet : मोदी कॅबिनेट 3.0! नितीन गडकरी, पीयुष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची सविस्तर यादी पाहा 

Narendra Modi : मै नरेंद्र दामोदरदास मोदी... तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ग्रँड सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्री संजीव अरोरांना सलाम! त्यांनी भाजपमध्ये जाण्याऐवजी तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडला, केजरीवालांनी केलं कौतुक
मंत्री संजीव अरोरांना सलाम! त्यांनी भाजपमध्ये जाण्याऐवजी तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडला, केजरीवालांनी केलं कौतुक
खासदार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार, थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद 
खासदार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार, थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद 
Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Embed widget