एक्स्प्लोर

Pankaja Munde: सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी; लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे; पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे?

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी जालना -वडीगोद्री येथे  दाखल झाले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची हाकेंची मागणी आहे.

 जालना : अंतरवली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)  आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare)  यांचे गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरूय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)  देताना ओबीसी समाजाला (OBC)  धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे.  दरम्यान लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांनी ट्वीट केले आहे. तसेच समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. हाके यांच्या  उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या , लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे.

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी जालना -वडीगोद्री येथे  दाखल झाले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची हाकेंची मागणी आहे.  मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड दाखल झाले आहेत. 

लक्ष्मण हाके यांच्या मागण्या काय?

  • ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले पाहिजे.
  • कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.
  • ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी.
  • ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हात योजना कार्यान्वित व्हावी.
  • ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

लक्ष्मण हाके म्हणाले,  आमची एकच विनंती एका बाजूला शासन आणि सर्वच पक्षाचे प्रमुख ओबीसीला धक्का लागणार नाही म्हणत आहेत.  त्याचवेळी मनोज जरांगे आम्ही ओबीसी मराठा समाज घुसवला असं म्हणत आहेत. त्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण ओबीसींना डावलल्याची भावना आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही? आणि आत्ताच्या ज्या कुणबी नोंदी दिल्या जात आहेत. शासनाच्या संरक्षणमध्ये खाडाखाडी करून कुणबी नोंदी चे प्रमाणपत्र दिले जात आहेत, याच लेखी उत्तर सरकार ने द्यावे. आम्ही कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही, आमचे शिष्टमंडळ उद्या मुंबईला जाईल, पण ओबीसींना कसा धक्का लागत नाही हे सरकार ने सांगावे, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील.

हे ही वाचा :

पंकजा मुंडेंचा आक्रोश पाहवत नव्हता, बीडमधील मुंडे समर्थकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; मनसेच्या नेत्याचं भाकीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget