एक्स्प्लोर

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

Maratha Reservation Agitation: अंतरवाली सराटीत दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना आता पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलंय.

Maratha Reservation Agitation : मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आंदोलनाला बसले आहेत. तर या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान अंतरवाली सराटीत दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याना आता पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस 

अंतरवाली सराटीतील दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी आंतरवाली सराटीतून उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरूय. मनोज  जरांगे  यांच्यासोबत काही मराठा आंदोलक देखील आमरण उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान आजच्या तिसऱ्या दिवशी दोन आंदोलकांना अशक्तपणा आल्याने तब्येत खालावली  आहे. यात एका महिला उपोषणकर्त्याचां देखील समावेश आहे. येरमाळा येथील मंदाकिनी बारकुल आणि बीड येथील भास्कर खांडे हे  देखील उपोषणाला बसले होते. यावेळी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यामुळे या दोन्ही उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय.

जरांगे पाटलांच्या नेमक्या मागण्या काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे. आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावे, या सह आठ-नऊ मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे सादर केल्या असल्याचे सांगितलंय. तसेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, यासाठी सुद्धा आपण लढायचे आहे. यातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आपण या आंदोलनात केली आहे. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण लढणार आहोत. सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा. मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Astrology: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जून ते डिसेंबर, शेवटचे 7 महिने भाग्योदयाची वेळ, पैसा, नोकरी, प्रेम...
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जून ते डिसेंबर, शेवटचे 7 महिने भाग्योदयाची वेळ, पैसा, नोकरी, प्रेम...
NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन? पोलिसांच्या चौकशीला वेग; आतापर्यंत चार जणांचा जबाब नोंद
NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन? पोलिसांच्या चौकशीला वेग; आतापर्यंत चार जणांचा जबाब नोंद
Sunetra Pawar: पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, 'आपण महायुती म्हणून एकत्र, पण...'
पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, 'आपण महायुती म्हणून एकत्र, पण...'
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टरांची संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टरांची संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Embed widget