एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashok Chavan : शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचंय? : अशोक चव्हाण

Ashok Chavan : शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे समजायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले होते.

Ashok Chavan, नांदेड : "आरक्षणाचा विषय दिसतो तसा सोपा नाही. कोणाचं आरक्षण काढून घेणे एवढे सोप नाही. मनोज जरागेंचे अनेक गैरसमज दूर केले आहेत. पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबर मध्ये मतदान होईल असा अंदाज आहे", असं भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. जालन्यातील परतूर येथे भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही

कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही, मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू असून त्यांचे अनेक गैरसमज दूर झालेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील असा अंदाज देखील अशोक चव्हाण यांनी वर्तवला आहे.  

पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.8) शरद पवारांच्या डोक्यातले कळायला देवेंद्र फडणवीस यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, अशी टीका केली होती.याला प्रत्युत्तर देत त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचा आम्हाला काय करायचं? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केलाय.  दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील, असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केलाय. 

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, माझी आणि बावनकुळे साहेबांची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की, मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय मानसिकता आहे. त्या भागातील लोकांचं काय मत आहे. हे मी जाणतो समजतो. मला परतूर मतदारसंघामध्ये जाण्यास आवडेल, असं मी बावनकुळ यांना आवर्जुन सांगितलं. 

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत अशोक चव्हाण यांनी आज दुपारी परतूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या परतूर मतदारसंघातील अठरा पगड जातींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एकिकडे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे फटका बसल्यानंतर अशोक चव्हाण मराठवाड्यात सक्रिय झाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar : मला पण विचार येतो एवढी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेतात तर बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा : अजित पवार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Embed widget