शरद पवारांना आम्ही जाणता राजा म्हणतो, दिल्लीश्वर ग्रेट मराठा बोलतात : आनंद अडसूळ
Anandrao Adsul on Sharad Pawar, मुंबई : "शरद पवार (Sharad Pawar) यांना आम्ही जाणता राजा म्हणून बोलतो आणि दिल्लीश्वर ग्रेट मराठा बोलतात", असे शिदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) म्हणाले.
Anandrao Adsul on Sharad Pawar, मुंबई : "शरद पवार (Sharad Pawar) यांना आम्ही जाणता राजा म्हणून बोलतो आणि दिल्लीश्वर ग्रेट मराठा बोलतात", असे शिदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) म्हणाले. उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशनच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचा अनावरण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, माजी मंत्री आनंदराव अडसूळ उपस्थित आहेत.
सत्ता कुणाचीही असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला छाया देणारे शरद पवार आहेत
बाळासाहेब थोरात म्हणाले, सत्ता कुणाचीही असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला छाया देणारे शरद पवार आहेत. पक्षी झाडावर बसतात घरटे बांधतात काही उडून जातात आणि जागा मोकळी करतात. पारनेर तालुक्यातील अनेक लोक दुष्काळात मुंबईत आले. गुलाबराव शेळके देखिल त्यावेळी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत येऊन बँक उभी केली आणि गावाकडून आलेल्यांना आधार दिला. नाव मोठं असून चालत नाही. तुमचा सर्वसामान्यांना आधार असायला हवा.
गुलाबराव शेळके अतिशय गरीब कुटुंबातून आणि दुष्काळी भागातून पूढे आले
शरद पवार म्हणाले, गुलाबराव शेळके अतिशय गरीब कुटुंबातून आणि दुष्काळी भागातून पूढे आले. पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नाही असा तो काळ होता. ते ज्या भागातून येत होतें त्यावेळीं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. सन्मानाने जगायचं असेल तर घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन ते मुंबईला आले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू सॉलिसिटर झाले होते. त्यावेळी गुलाबराव शेळके देखील सॉलिसिटर होते. अनेक कायदे विषयक मार्गदर्शन देशाला सॉलिसिटर करत होते. त्याचं मार्गाने गुलाबराव गेले. एक मराठी माणूस हे काम करत होता हे अभिमानास्पद आहे.
आनंदराव अडसूळांकडून शरद पवारांचे कौतुक
आनंद अडसूळ शिवसेनेत असले तरी त्यांनी शरद पवारांचे कौतुक केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आनंदराव अडसूळ यांचे सुपूत्र अभिजीत अडसूळ यांनी राज्यपाल पदावरून महायुतीला इशारा दिला होता. दरम्यान, आज आनंद अडसूळ आज शरद पवारांचे कौतुक करताना पाहायला मिळाले.
Jayant Patil : अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, जयंत पाटील म्हणाले, अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड