Amit Thackeray: 'माहीम विधानसभा साहेबांना भेट देणार'; शिंदेंच्या उमेदवारावर रोख, अमित ठाकरेंचं भाषण गाजलं!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरेंच्या भाषणादरम्यान टाळ्यांचा कडकडाट देखील झाला.
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Anit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल अमित ठाकरेंनी माहीम विधानसभेतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.
अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) दादर-माहीमधील रहिवाशांच्या समस्यांवर भाष्य केले. तसेच विद्यामान आमदार सदा सरवणकर यांच्यावर देखील निशाणा साधला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंनी माहीम विधानसभेत पहिल्यांदाचा भाषण केले. अमित ठाकरेंच्या भाषणाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद देखील पाहायला मिळाला. अमित ठाकरेंच्या भाषणादरम्यान टाळ्यांचा कडकडाट देखील झाला.
अमित ठाकरे काय म्हणाले?
अमित ठाकरे म्हणाले की, मी जे पाऊल उचललं आहे, ते जबाबदारीने आणि पक्षासाठी उचलले आहे. मला उमेदवारी दिली, तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असं विधान केलं होतं. यानंतर राज ठाकरेंनी मला विचारलं, काय रे तु असं बोलला...मी म्हटलं हो..पक्षाला गरज असेल तर मी निवडणुकीसाठी उभा राहण्यास तयार आहे, असं बोललो होतो. मला उमेदवारांची यादी येईपर्यंत काहीच माहिती नव्हतं की मला माहीम विधानसभेतून निवडणूक लढायची आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
माहीम विधानसभा साहेबांना भेट म्हणून द्यायची आहे- अमित ठाकरे
मी इकडे लहानपणापासून वाढलो आहे. माझे हे 32 वर्षे माहीममध्येच गेले. आपण आता विचार करायला हवा की गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच समस्या आहेत. आपण त्याच त्याच आमदारांना निवडूण देत आहोत. माझ्या जन्माआधी ते (सदा सरवणकर) नगरसेवक होते. आता मलाही मुलगा झाला आहे. तुमचेही मुले असतील, नातवंड असतील. त्यामुळे आपण अशी कामे केली पाहिजे की पुढच्या भविष्यात लोकांनी बोललं पाहिजे, हे माझ्या आई-वडिलांनी केलंय, हे माझ्या आजी-आजोबांनी केलं आहे. मला ही माहीम विधानसभा साहेबांना भेट म्हणून द्यायची आहे. दिवाळी 2-3 नोव्हेंबरला आहे. पण आपल्याला 23 नोव्हेंबरला फटाके फोडायचे आहेत, असंही अमित ठाकरेंनी सांगितले.
आज दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी माहीम विधानसभेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला माहीम विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार श्री. अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.!#MNSAdhikrut pic.twitter.com/sSGZA9FeRt
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 24, 2024
माहीम विधानसभेत तिरंगी लढत-
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना तिकीट देण्यात आली आहे. माहीम विधानसभेत भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना दिला आहे.