Aditya Thackeray On Ashish Shelar And Nishikant Dubey: ठाकरे बंधूंवर भाजपकडून हल्लाबोल; आदित्य ठाकरेंनी आशिष शेलार अन् निशिकांत दुबेंना अंगावर घेतले, म्हणाले...
Aditya Thackeray On Ashish Shelar And Nishikant Dubey: महाराष्ट्रातील आमदार आशिष शेलार आणि झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Aditya Thackeray On Ashish Shelar And Nishikant Dubey: पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायेत. दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणाऱ्या आहेत, असं विधान मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं. तर झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मराठी लोकांना डिवचत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे.
आशिष शेलार आणि निशिकांत दुबे यांच्या टीकेला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप दरोरोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे. काल भाजपने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली. ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. आज भाजपचा तो खासदार, ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही- आदित्य ठाकरे
प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे?, हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपचं जुनंच “फोडा आणि राज्य करा” धोरण आहे. खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी...महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही. त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो, द्वेष, फूट आणि भांडणं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
भाजप महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार- आदित्य ठाकरे
पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या 'प्लेबूक' जाळ्यात अडकू...हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा, हीच भाजपची नीती आहे. तसेच जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई न केल्यास महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे, हे स्पष्ट होईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 7, 2025
पण सावध राहा — हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!… pic.twitter.com/gQTQBfyPcP

























