एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray: मराठी लोकांना डिवचलं, राज अन् उद्धव ठाकरेंनाही अंगावर घेतलं, कोण आहेत निशिकांत दुबे?

Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray: मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं.

Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray: भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे. 

मराठी लोकांना डिवचलं-

मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला.

कोण आहेत निशिकांत दुबे?

निशिकांत दुबे यांनी 2009 मध्ये गोड्डा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि 2014, 2019 आणि 2024 मध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले. ते लोकसभेत भाजपचे प्रमुख वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी वित्त, लोकलेखा, नियम, प्राक्कलन आणि पर्यटन व संस्कृती मंत्रालयाच्या समित्यांमध्ये काम केले आहे. 2025 मध्ये त्यांना त्यांच्या संसदीय कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कार मिळाला.

भाजपच्या निशिकांत दुबेंची बेताल वक्तव्ये-

- सुप्रीम कोर्टावरील टीका (2025): निशिकांत दुबे यांनी वक्फ कायद्याशी संबंधित प्रकरणात सुप्रीम कोर्ट आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सुप्रीम कोर्ट धार्मिक युद्ध भडकवत असल्याचा आरोप केला. 
भाजपने त्यांच्या या वक्तव्यापासून हात झटकले, आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वक्तव्याला "बेजबाबदार" ठरवत अवमान याचिका फेटाळली.

- योगी आदित्यनाथांवरील वक्तव्य (2025): एका पॉडकास्टमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी "दिल्लीत 20-25 वर्षे जागा नाही" असे वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय चर्चा सुरू रंगली होती.

- महुआ मोइत्रा प्रकरण (2023): तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर "कॅश फॉर क्वेरी" प्रकरणात खळबळजनक आरोप केले होते

-  निशिकांत दुबेंनी 2025 मध्ये दावा केला की, पाकिस्तान चार तुकड्यांत विभागला जाईल

- मराठी भाषा वाद (2025): महाराष्ट्रातील मराठी भाषा वादात त्यांनी हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांवर टीका करत उर्दू भाषिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.

निशिकांत दुबे काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदाराचं राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना आव्हान

Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार नाही?, राज ठाकरेंच्या आदेशाने संभ्रम वाढला; म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : धुरळा निवडणुकीचा : 12 Nov 2025 : Elections Updates : ABP Majha
Nagpur Congress Rift: बैठकीला Sunil Kedar यांची गैरहजेरी, केदारांनी घेतलेल्या मुलाखती अवैध घोषित
Nagpur Congress Rift: बैठकीला Sunil Kedar यांची गैरहजेरी, केदारांनी घेतलेल्या मुलाखती अवैध घोषित
Delhi Blast: डॉ. Muzammil च्या चौकशीत मोठा खुलासा, WhatsApp ग्रुप सोडणारे NIA च्या रडारवर
Maharashtra Politics: वंचितसोबत आघाडी केल्यास फायदा, Congress बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Embed widget