लग्नानंतर अनेक महिलांचे आडनाव बदलले जातात. पण यामुळे PF काढताना अनेक अडचणी निर्माण होतात. EPFO अकाऊंटमध्ये लग्नानंतर आडनाव कसे बदलायचे? याची सोपी माहिती आपण जाणून घेऊयात...लग्नानंतर जर तुमच्या आधारकार्डवर नाव बदलले असेल तर तुम्हाला EPFO मध्ये देखील नाव बदलावे लागते. नाहीतर PF काढताना, पेन्शन काढताना किंवा PF ट्रान्सफर करताना अनेक अडचणी येतात, म्हणून EPFO नेहमी तुमचा आधार, पॅन आणि बँक रेकॉर्ड जुळवून माहितीची पडताळणी करते.EPFO खात्यात आडनाव बदलण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ऑफलाईन आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला EPFO कार्यालयात जावं लागेल. यासोबत तुम्ही घरबसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने EPFO मधील आडनाव बदलू शकता.ऑनलाईन EPFO खात्यात नाव कसं बदलायचं?सर्वात आधी EPFO च्या वेबसाईटवर जाऊन तुमचे खाते लॉगिन करून घ्या. त्यानंतर मॅनेज सेक्शनमध्ये Modify Basic Details पर्याय निवडा.आता तुमच्या आधारकार्डवर जे नवीन आडनाव आहे ते इथे टाका आणि Update Details वर क्लिक करा.बदलाची विनंती तुमच्या नियोक्त्याकडे जाईल, जे कागदपत्रे तपासतील आणि EPFO कडे पाठवतील.EPFO अधिकारी अंतिम मंजुरीनंतर बदल स्वीकारतील.संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे 15 ते 30 दिवस लागतील.ऑफलाइन पद्धतीने आडनाव कसं बदलायचं?सर्वप्रथम Joint Declaration फॉर्म डाउनलोड करा, ज्यामध्ये जुने आणि नवीन आडनाव स्पष्टपणे लिहा.आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र किंवा इतर ओळखपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे जोडा.तुमच्या नियोक्त्याचा फॉर्मवर सही आणि शिक्का घ्या.सर्व कागदपत्रे EPFO प्रादेशिक कार्यालयात जमा करा.बदल करण्यासाठी सुमारे 15-30 कामकाजाचे दिवस लागू शकतात.त्यासाठी तुम्हाला अपडेट आधार कार्ड, पॅन कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट आणि संयुक्त घोषणाप्रमाणपत्र लागेल.