(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar : अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावे आणि माझ्या ऐवजी त्यांनी मंत्री बनावं, अब्दुल सत्तारांची ईश्वराकडे प्रार्थना
Abdul Sattar, जालना : "टायगर अभी जिंदा है! लागेल ती मदत करण्यासाठी मी आणि माझं डिपार्टमध्ये तयार आहे. माझ्यापेक्षा अर्जुन खोतकर जवळपास केवळ 6 महिन्यांनी लहान आहेत. पुढील विधानसभेत माझ्याऐवजी अर्जुन खोतकर यांनी मंत्री बनावं.
Abdul Sattar on Arjun Khotkar, जालना : "टायगर अभी जिंदा है! लागेल ती मदत करण्यासाठी मी आणि माझं डिपार्टमध्ये तयार आहे. माझ्यापेक्षा अर्जुन खोतकर जवळपास केवळ 6 महिन्यांनी लहान आहेत. पुढील विधानसभेत माझ्याऐवजी अर्जुन खोतकर यांनी मंत्री बनावं. प्रतापरावांच्या माध्यमांतून केंद्रात आपला टायगर गेलाय. दुसरा टायगर जाणे बाकी आहे", असे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. जालना येथे अब्दुल सत्तार यांचा नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
ब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांना वाघाची उपमा दिली
अर्जून खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावे आणि माझ्या ऐवजी त्यांनी मंत्री बनाव, अशी प्रार्थना अब्दुल सत्तार यांनी ईश्वराकडे केली आहे. टायगर अभी जिंदा है,म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांना वाघाची उपमा दिली. टायगरला जी मदत लागेल ती मी करेन, अर्जुन खोतकर यांना उद्देशून अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
केंद्रात प्रतापराव जाधव यांच्या निमित्ताने आमचा एक वाघ दिल्लीत गेला, दुसरा वाघ जाणं बाकी
अर्जुन खोतकर यांनी विधानसभेमध्ये निवडून यावे,माझ्या ऐवजी त्यांना मंत्री बनवावे अशी प्रार्थना अब्दुल सत्तार यांनी देवाकडे केली. टायगर अभी जिंदा है म्हणत सत्तार यांनी खोतकर यांना उद्देशून आपण वाटेल ती मदत करू असा आश्वासन देखील त्यांनी दिलं. जालना येथे अब्दुल सत्तार यांचा नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगरच्या शिवसेनेत सर्व काही अलबेला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण शहरात असूनही आमदार संजय शिरसाट हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याचा सूर होता. दुसरीकडे त्यांनीच मुख्यमंत्र्यांना सिल्लोडमध्ये विरोध करत काळे झेंडे दाखवले हे काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना नाही तर अब्दुल सत्तारांना होते असं थेट म्हटलं होतं. यावर सत्तारांनी देखील विरोधक असायला हवेत त्यांचा मी सन्मान करतो असं म्हटलं होतं. दरम्यान संजय शिरसाट यांच्यासोबत मंत्रीपदावरुन संघर्ष सुरु असताना अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर मंत्री बनावे अशी प्रार्थना केलीये.
इतर महत्वाच्या बातम्या