एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!

Tumsar Assembly Constituency : भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघात मातब्बर नेत्याने विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

भंडारा : जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील (Tumsar Assembly Constituency) एक मोठा राजकीय चेहरा म्हणून माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांच्याकडं बघितलं जातं. भंडाऱ्यात आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांची एन्ट्री झाल्यानंतर चरण वाघमारे आणि परिणय फुके यांचं कधी जमलं नाही. त्यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा वाघमारे यांच्यावर ठपका ठेवत भाजपनं (BJP) त्यांना पक्षातून काढलं. त्यानंतर आता त्यांची आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन वेगवेगळे गट स्थापन झाल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील गाजा वाटपाचा फॉर्म्युला तयार असला तरी, कुठल्याही पक्षाचा त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अशात भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघावर सध्या अजित पवार गटाचे आमदार असतानाही भाजपनं यावर दावा केलेला आहे. तर, शरद पवार गटानं देखील तुमसरची जागा मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. तर, दुसरीकडं काँग्रसनंही या जागेवरील दावा सोडलेला नाही. 

...तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही

त्यातच कार्यकर्त्यांच्या भरोशावर या मतदारसंघावर सुरुवातीपासून चरण वाघमारे यांनी पकड ठेवलेली असून त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. चरण वाघमारे हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. भाजपमधून काढल्यानंतर ते आता जोपर्यंत परिणय फुके भाजपात आहे. तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

चरण वाघमारे तुतारी हाती घेणार? 

आज तुमसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत आहे. या यात्रेच्या निमित्ताने राजू कारेमोरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता चरण वाघमारे कुठल्या पक्षाकडून लढतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी आगामी काळात ते तुतारी हातात घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 

विधानसभा निवडणूक मी नक्की लढणार : चरण वाघमारे 

याबाबत चरण वाघमारे म्हणाले की, लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना पाठिंबा देताना जाहीर केलं होतं की, विधानसभा निवडणूक मी नक्की लढणार आणि ती लोकवर्गणीतून लढवणार आहे. मी कुठल्याही पक्षाकडं उमेदवारी मागितलेली नसली तरी शरद पवार पक्षाचे नेते माझ्या संपर्कात आहेत. शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घेण्याबाबत माझा अजून अंतिम निर्णय झालेला नाही. जोपर्यंत परिणय फुके हे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात भाजपत आहेत तोपर्यंत मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. 2 तारखेपर्यंत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात माझे दौरे आहेत. त्यानंतर पक्षाची उमेदवारी घ्यायची की अपक्ष लढायचे, याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आता चरण वाघमारे नेमके कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

विधानसभेची खडाजंगी: भंडाऱ्यात 3 मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Embed widget