एक्स्प्लोर

Warli Painting : पालघरमधील महिला चित्रकारांनी औरंगाबादमध्ये साकारली वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग!

Warli Painting : पालघर येथील 'द धवलेरी ग्रुप' च्या सहा महिला वारली चित्रकारांनी औरंगाबाद इथे 3200 चौरस फुटांची वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग काढून नवा विक्रम केला आहे.

Warli Painting : पालघर (Palghar) जिल्ह्यातील महिला वारली चित्रकारांनी (Warli Painting) पुन्हा एकदा वारली चित्रकलेला जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिलं आहे. पालघर येथील 'द धवलेरी ग्रुप' च्या सहा महिला वारली चित्रकारांनी औरंगाबाद (Aurangabad) इथे 3200 चौरस फुटांची वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग (World Largest Warli Painting) काढून नवा विक्रम केला आहे. पालघर इथल्या सहा आदिवासी वारली आर्टिस्ट आणि औरंगाबादच्या 120 स्थानिक मुलींच्या माध्यमातून ही वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेटिंग साकारण्यात आली आहे. यामध्ये वारली महिलेचे जन्मपासून ते मृत्यूपर्यंत जे पारंपरिक काम दाखवण्यात आले आहे.

G-20 परिषदेनिमित्त वारली पेंटिंग, विश्वविक्रमाला गवसणी

G-20 परिषदेनिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट  सिटीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. 456 फूट लांब आणि सात फूट उंच अशा 3200 चौरस मीटरच्या भिंतीवर लार्जेस्ट वारली पेंटिंग साकारण्यात आली. G-20 परिषदेचा मान औरंगाबाद शहराला मिळाल्यानंतर, औरंगाबाद महापालिकेने वारली पेंटिंग काढण्याचे ठरवले. यासाठी पालघरमधील 'द धवलेरी ग्रुप'च्या सहा महिला चित्रकार औरंगाबाद इथे गेल्या होत्या. यावेळी 120 महिलांनी अवघ्या सहा तासात ही चित्रकला साकारत विश्वविक्रमाला (World Record) गवसणी घातली. या अनोख्या वारली चित्रकलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Warli Painting : पालघरच्या वारली चित्रकलेचा जागतिक पातळीवर ठसा, औरंगाबादमध्ये अवघ्या सहा तासात साकारलं जगातील सर्वात मोठं वारली चित्र!

पेंटिंगद्वारे आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेल्या नात्याचं दर्शन

औरंगाबाद इथे गेलेल्या वारली चित्रकारांमध्ये किर्ती वरठा, पूनम कोल, तारा बोंबाडे, राजेश्री भोईर, तनया उराडे, शालिनी कासट अशा सहा कलाकारांचा समावेश आहे. या पेंटिंगमध्ये जन्मावेळी सुईण महिला, लग्नाच्या वेळी सुवासिन आणि धवलेरी महिला यांच चित्र रेखाटण्यात आलं आहे. धवलेरी महिलांच्या हातून आमचे लग्न लावतात, असं या महिला कलाकारांनी सांगितलं. महिलेचे महत्त्वाचे स्थानही वारली पेंटिंगच्या माध्यमातून दाखवले आहे. संपूर्ण वारली पेंटिंगमध्ये आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले नाते, वारली नृत्य, राहणीमान, सण, जल, जंगल, जमिनीशी संवाद दाखवण्यात आले आहेत.

'ही केवळ चित्रकला नसून आदिवासी लिपी'

पेंटिंगमधून वारली चित्रकला ही केवळ पेंटिंग नसून आदिवासी (वारली) लिपी आहे. यामध्ये आदिवासी समाजाचे निसर्गाशी जोडलेले अतूट नाते दर्शवते. आदिवासींचे जगणे जर इतर समाजांनी स्वीकारले तर आज जे आपल्याला पर्यावरणाच्या धोका आहे तो थांबू शकतो, असा संदेश देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
Uday Samant : ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
Ind vs Eng 2nd ODI : नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
The Mehta Boys Review : बापलेकाच्या नात्याची कहाणी, वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'
वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'; बोमन इराणी आणि अविनाश तिवारीच्या जोडीची कमाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Mumbai Speech : कोकणची ट्रेन गोरखपूरला वळवली,उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशाराABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 07 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सAmol Mitkari Akola : बेघर निवारा केंद्राची मिटकरींकडून पाहणी,नागरिकांच्या समस्यांचा आढावाAnant Kalse On Shiv Sena : ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात जाणार? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
Uday Samant : ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
Ind vs Eng 2nd ODI : नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
The Mehta Boys Review : बापलेकाच्या नात्याची कहाणी, वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'
वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'; बोमन इराणी आणि अविनाश तिवारीच्या जोडीची कमाल
Dhule News : धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
Shivsena UBT :  राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेचं संसदेत नवं कार्यालय सुरु, खासदारांचा फोटो समोर
राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेचं संसदेत नवं कार्यालय, खासदारांचा फोटो समोर
Ladki Bahin Yojana : जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखानं घटली, आणखी लाभार्थी कमी होणार? नेमकं कारणं काय?
जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखानं घटली, येत्या काळात लाभार्थी कमी होणार?
Arrest Warrant Against Actor Sonu Sood: अभिनेता सोनू सूदवर अटकेची टांगती तलवार; अटक करुन हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता सोनू सूदवर अटकेची टांगती तलवार; अटक करुन हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, प्रकरण नेमकं काय?
Embed widget