उस्मानाबादमधील 'त्या' पत्रलेखिकेने घेतला मोकळा श्वास, तीन ते चार इंच जाडीच्या शेंदराचा थर काढला
Osmanabad News Update : उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्वर मंदिर येथील पत्रलेखिकेचे शिल्प गेल्या कित्येक वर्षांपासून शेंदराच्या थराखाली झाकलेले होते. शिल्पावरील तीन चे चार इंच जाडीचा थर काढल्यामुळे पत्रलेखिकेने मोकळा श्वास घेतला.
![उस्मानाबादमधील 'त्या' पत्रलेखिकेने घेतला मोकळा श्वास, तीन ते चार इंच जाडीच्या शेंदराचा थर काढला Osmanabad News Update Three to four inches thick sandur layer was removed from the sculpture of at Mankeshwar in Osmanabad district उस्मानाबादमधील 'त्या' पत्रलेखिकेने घेतला मोकळा श्वास, तीन ते चार इंच जाडीच्या शेंदराचा थर काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/3754ece326d0b862a66f2e577c65118d1659718838_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Osmanabad News Update : उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यामधील माणकेश्वर येथील पत्रलेखिकेच्या शिल्पावरील तीन चे चार इंच जाडीचा थर काढल्यामुळे पत्रलेखिकेने मोकळा श्वास घेतला आहे. शेंदराचा थर काढल्यानंतर मंदिर संस्थान आणि गावकऱ्यांनी उर्वरित सर्व ठिकाणी लावलेला शेंदूर काढून परिसराची स्वच्छता करण्याची हमी देत यापुढे असा प्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत आश्वासन दिले. यामुळे पुरातत्त्व विभाग आणि इतिहास प्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील माणकेश्वर मंदिर येथील पत्रलेखिकेचे हे शिल्प गेल्या कित्येक वर्षांपासून शेंदराच्या थराखाली झाकलेले होते. माणकेश्वर मंदिराच्या शेजारीच सटवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाला असंख्य भाविक येत असतात. सटवाई देवी लहान मुलांचे भविष्य पाटीवर लिहिते अशी अख्यायिका आहे. सटवाई देवी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या चालुक्यकालीन असलेले मंदिर ज्यावरुन या गावाचेही नाव पडले आहे, असे माणकेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पत्रलेखिकेचे शिल्प आहे. परंतु, या पत्रलेखिकेवर शेदराचा मोठ्या प्रमाणात थर चढला होता.
सटवाई देवीच्या अख्यायीकेशी साम्य दर्शविणारे लेखिकेचे हे शिल्प समजून लोकांनी त्यावर शेंदूर लावण्यास सुरवात केली. वर्षानुवर्षे शेंदूर लावला जात असल्याने मूर्तीवर जाड थर तयार झाला होता. त्यामुळे अक्षरशः मूर्तीचे मूळ स्वरुपही पूर्णपणे झाकले गेले. काल पुरातत्त्व विभाग आणि औरंगाबाद येथील अधिकारी मंदिराच्या पाहणीसाठी गेले असता, या प्रकारावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांची समजूत काढून आपल्या गावात असलेल्या या प्राचीन व अतिशय महत्त्वपूर्ण वारशाप्रती जागरूक होण्याबाबत गावकऱ्यांना आव्हान केले. अधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीवरील सर्व शेंदूर काढला. त्यामुळे या लेखिकेच्या शिल्पाने कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला.
शेंदूर काढल्यानंतर आता लवकरच माणकेश्वर मंदिराच्या स्थळ व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडाही तयार करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या प्रसंगाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती जागरूक होऊन त्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत व आपल्या या वारशास कोणत्याही स्वरूपाची हानी होणार नाही याची दक्षता घेणेबाबत पुरातत्त्व विभाग आव्हान करत आहे.
कोणत्याही वारसा स्थळी अशा स्वरूपाचे गैरवर्तन होत असल्याचे आढळून आल्यास तेथील लोकांना या वारसावैभवाप्रती जागरूकता निर्माण करून दिली पाहिजेत, श्रद्धा ही डोळस असावी ही जाणीव निर्माण करून दिली पाहिजे.
पुरातत्त्व विभाग तर आपले कार्य करत असतेच. परंतु वारसा जतन करण्याच्या कार्यात सामान्य नागरिकांचे योगदान असणेही तेवढेच अपेक्षित आहे. शेवटी ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी की, सांस्कृतिक वारसा हा लोकांद्वारे, लोकांचा, लोकांसाठी आहे, अशा भावना भाविकांमधून व्यक्त होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)